कोल्हापूर – अमरावती येथील सभेत पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी एका धारकर्याला ‘द कुराण अँड द काफीर’ या पुस्तकातील उतारा वाचण्यास सांगितला होता. काँग्रेस सरकारच्या काळात प्रकाशित झालेले हे पुस्तक आहे. असे असतांना विधानसभेत आणि राज्यभर काँग्रेस, पुरोगामी, डावे अकारण पू. भिडेगुरुजी यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करत आहेत, आंदोलन करत आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयात प्रविष्ट झालेल्या याचिकेवर निर्णय देतांना उच्च न्यायालयाने ‘एका व्यक्तीच्या विरोधातच याचिका का ?’ असा प्रश्न विचारून पू. भिडेगुरुजी यांचे नाव वगळण्याच्या सूचना केल्या आहेत. तरी यापुढील काळात पू. संभाजी भिडेगुरुजी यांची अपकीर्ती न थांबवल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी सकल हिंदु समाजाच्या वतीने ८ ऑगस्ट या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव आणि शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे आणि श्री. उदय भोसले, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हासहमंत्री श्री. विजय पाटील यांसह अन्य उपस्थित होते.
तरी या प्रकरणी आम्ही मागण्या करतो की…
१. पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करणार्या आणि विधानसभेत चुकीची मागणी करणार्या आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर, तसेच पू. भिडेगुरुजी यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणारे मंत्री छगन भुजबळ त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा.
२. सोलापूर येथे २ ऑगस्ट या दिवशी पू. भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांना तेथील पोलीस निरीक्षकांनी मारहाण केली. या प्रकरणी विधानसभेतही सोलापूरच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तरी याला उत्तरदायी असलेल्या पोलीस निरीक्षकांना तात्काळ निलंबित करावे.