सरकारने ‘हाफकीन’चे पैसे रखडवल्‍याने वर्षभरात सरकारकडून औषध खरेदी नाही !

सरकार १५० कोटी रुपये विज्ञापनासाठी व्‍यय करते; मात्र ‘औषध खरेदीसाठी पैसे देत नाही’, सरकार जनतेच्‍या जिवाशी खेळत असल्‍याचा अंबादास दानवेंचा आरोप !

राज्यातील ३५ ‘टॉप’ शाळांमध्ये रत्नागिरीतील २ शाळा

शालेय शिक्षण विभागाकडून ‘लेट्स चेंज’ या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर’ बनवण्यात आले आहे.

रोगप्रतिकारक्षमता – आपल्‍या शरिराची ढाल !

रोगांशी लढण्‍याची आपल्‍या शरिराची क्षमता, म्‍हणजे रोगप्रतिकारक्षमता ! याविषयी कोरोना महामारीच्‍या काळात सर्व जणांमध्‍ये जागृती झाली; कारण कोरोना विषाणूचा रोगप्रतिकारक्षमता चांगली असणार्‍या व्‍यक्‍तीला फार त्रास झाला नाही.

मानसिक आरोग्‍यप्राप्‍तीसाठी स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व !

१० ऑक्‍टोबर या दिवशी असलेल्‍या ‘जागतिक मानसिक आरोग्‍य दिना’च्‍या निमित्ताने..

लोकांवर महागडे उपचार घेण्याची वेळ आणू नका ! – गोवा खंडपिठ

राज्यातील शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात. लोकांवर महागडे उपचार घेण्याची वेळ आणू नका, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने राज्य सरकारला दिले आहेत

कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेर घाणीचे साम्राज्य !

अस्वच्छ शहरे देशाला प्रगतीपथावर कशी नेणार ?

पाकमधील पोलिओची ९० टक्के प्रकरणे ही अफगाणिस्तानमधून ‘आयात’ ! – नदीम जान, आरोग्य मंत्री, पाकिस्तान

असे सांगून पाक जगापासून त्याचा नाकर्तेपणा लपवू शकत नाही. ज्या देशातील लहान मुलांना केवळ हिंदुद्वेषच शिकवला जातो आणि अधिकाधिक पैसा केवळ युद्धसिद्धतेसाठीच खर्च केला जातो, त्या देशात यापेक्षा वेगळे काय होणार !

सातारा जिल्‍ह्यात डेंग्‍यू आणि चिकनगुनियाचे ३१२ रुग्‍ण !

सातारा जिल्‍ह्यात पावसामुळे डासांच्‍या उत्‍पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सातारा जिल्‍ह्यात डेंग्‍यू आणि चिकनगुनियाचे रुग्‍ण आढळून येत आहेत. वर्ष २०२३ मध्‍ये आतापर्यंत डेंग्‍यू आणि चिकनगुनियाचे ३१२ रुग्‍ण आढळून आले आहेत.

मिरज येथे ‘डॉल्‍बी’ आणि ‘लेझर लाईट’ विरोधी उत्‍स्‍फूर्त बैठक : चळवळ चालू करण्‍याचा निर्धार !

मशिदींवरील मोठ्या आवाजाचे अनधिकृत भोंगे बंद व्‍हावेत. श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीविषयी आचारसंहिता बनवून त्‍या संदर्भात प्रसार व्‍हावा. या संदर्भात निवेदन देणे.

शासन दायित्‍व झटकू शकत नाही ! – मुंबई उच्‍च न्‍यायालय

अनेक रुग्‍ण अत्‍यवस्‍थ स्‍थितीत रुग्‍णालयात आल्‍याने उपचाराच्‍या वेळी त्‍यांचा दुर्दैवी मृत्‍यू झाल्‍याचा युक्‍तीवाद राज्‍याचे महाधिवक्‍ता बीरेंद्र सराफ यांनी केला.