कोल्हापूर येथे जलअभियंत्यांना दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न !

शहरातील विस्कळीत पाणी आणि दूषित पाणीपुरवठा यांवरून १४ मे या दिवशी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी गोंधळ घातला.

ताथवडे (पुणे) येथील १० फिरत्या शौचालयांची चोरी !

ज्या ठिकाणी शौचालये नाहीत, तेथे ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या अंतर्गत फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात येतात.

पावसाळी गटारांतील गाळ २ दिवसांत न उचलणार्‍या ठेकेदारांना २ लाख रुपयांचा दंड

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळी गटारांतील गाळ काढण्याचे काम चालू असून गटारांतून काढलेला गाळ २ दिवसांत न उचलणार्‍या ठेकेदारांना २ लाख रुपयांचा दंड महापालिकेकडून आकारण्यात आला आहे.

आरोग्य : शहरी आणि ग्रामीण मुलांचे !

जर्मन विद्यापिठातील एका संशोधनात ‘शहरी भागातील मुलांच्या तुलनेत ग्रामीण भागातील मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले आहे’, असे स्पष्ट झाले आहे.

चायनीय अन्नपदार्थांचे सेवन केल्याने ‘दम्याचा झटका’ येण्याच्या प्रमाणात वाढ ! – श्‍वसनविकारतज्ञ

दमा असलेल्या रुग्णांना विविध प्रकारचे वास, तेलकट पदार्थ, धुळीचा संसर्ग यांचा हमखास त्रास होतो, तसेच बदलत्या वातावरणामुळेही दमेकर्‍यांना धाप लागते.

’हेडफोन’ ठरतोय बहिरेपणाचे कारण !

आजमितीला मुंबईसारख्या शहरात भ्रमणभाष संच नसलेला तरुण सापडणे विरळच ! भ्रमणभाष संचाला जोडलेला ‘हेडफोन’ कानाला लावून गाणी ऐकत आपल्याच धुंदीत चालणारे तरुण-तरुणी सर्वत्र पहायला मिळतात.

विविध वनौषधींपासून औषधे बनवण्याच्या दृष्टीने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पतींची माहिती कळवा !

‘संभाव्य आपत्काळात औषधांचा तुटवडा भासेल. त्या काळात रोगमुक्त रहाण्यासाठी ‘वनौषधींपासून बनवलेली औषधे’, हाच एकमेव पर्याय असेल. या वनौैषधींपासून औषधे (चूर्ण, वटी आदी) बनवण्याची प्रक्रिया महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या आयुर्वेद शाखेच्या वतीने करण्यात येणार आहे.

वर्ष २०१७-१८ साठी ‘जननी शिशु सुरक्षा योजने’वरील व्ययाच्या तरतुदीत निम्म्याने घट !

माता मृत्यू आणि बाल मृत्यू न्यून करणे, जननदर न्यून करणे या उद्देशाने जननी सुरक्षा योजना, तसेच जननी शिशु सुरक्षा योजना राबवण्यात येते. 

त्वचेवरील बुरशीच्या संसर्गाचे उच्चाटन होण्यासाठी लावण्यात येणार्‍या मलमांमुळे त्वचाविकार बळावत असल्याच्या तक्रारी !

पोट, कंबर, काख आदी शरिराच्या भागांत बुरशीचा संसर्ग झाल्यानंतर बहुतांश वेळा रुग्ण औषधविक्रेते किंवा स्थानिक आधुनिक वैद्य यांकडून औषधोपचार घेतात.

भ्रमणभाषच्या अतीवापरामुळे मानसिक रुग्णांत वाढ !

मीरा रोड – जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार प्रत्येक पाच महिलांमागे एक महिला, तर प्रत्येक १२ पुरुषांमागे एक पुरुष मानसिक आजारला बळी पडत आहे.


Multi Language |Offline reading | PDF