Athos Salome Cancer Prediction : अमेरिकेतील सूर्यग्रहणानंतर कर्करोगाच्या उपचारांत प्रगती होईल !

ब्राझिलमधील प्रसिद्ध ज्योतिषी एथोस सालोम यांचा दावा !

ज्योतिषी एथोस सालोम

वॉशिंग्टन (अमेरिका) – मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये ८ एप्रिलला सूर्यग्रहण दिसले. या ग्रहणावरून ब्राझिलमधील प्रसिद्ध ज्योतिषी एथोस सालोम यांनी म्हटले आहे की, या ग्रहणामुळे कर्करोगाच्या उपचारांत प्रगती होईल.

सलोम म्हणाले की, सूर्यग्रहणानंतर वैज्ञानिक संशोधन, नवीन साहित्य आणि औषध यांचा विकास होऊ शकतो. या प्रगतीमुळे कर्करोग, संसर्गजन्य आजार, अनुवांशिक रोग आदींच्या उपचारांमध्ये परिवर्तन होऊ शकते.