
सांगली, ३० जानेवारी – वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) येथील ९ कोटी रुपयांच्या चोरीच्या प्रकरणातील मुख्य संशयित मैनुद्दीन मुल्ला याची २९ जानेवारीला गणेशनगर भागात रात्री ९ वाजता हत्या करण्यात आली. वर्ष २०१६ मध्ये सांगली-मिरज रस्त्यावरील बेथलमनगर येथील मुल्ला याच्या घरातून ९ कोटी रुपये पोलिसांनी कह्यात घेतले होते. या प्रकरणात अन्वेषण करणार्या पोलिसांनी यातील पैसे घेतल्याने तत्कालीन पोलीस निरीक्षकांसह ७ पोलीस कर्मचार्यांना या प्रकरणी अटक झाली होती. (भ्रष्टाचारी पोलीस ! चोराकडील रकमेची चोरी करणारे पोलीस खात्याची सर्व अब्रू धुळीस मिळवत आहेत, असेच म्हणावे लागेल. – संपादक) याच प्रकरणात मुल्ला हा सध्या जामिनावर बाहेर होता. सांगली शहर पोलीस या प्रकरणाचे अधिक अन्वेषण करत आहेत.
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !