पोलीस खात्यात लाच घेणारे पोलीस असणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद !

नगर – येथे १७ ते २५ जानेवारी या कालावधीत शिर्डीतील हॉटेलवर चालू असलेली कारवाई टाळण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्यातील बाळासाहेब यशवंत सातपुते आणि प्रसाद पांडुरंग साळवे या २ पोलीस कर्मचार्यांना लाच घेतांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.
वरील कर्मचार्यांनी लाच मागितल्याची तक्रार नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यावरून शिर्डी पोलीस ठाण्यात सापळा रचून या दोघांना २ सहस्र रुपयांची लाच घेतांना कह्यात घेतले. (लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले पोलीस जनतेला कायद्याचे मार्गदर्शन काय करणार ? भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला, तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल ! – संपादक)
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह