पुण्यात जुगार खेळतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ४३ जणांना अटक

मुंढवा येथील माजी नगरसेवक अविनाश जाधव यांच्या क्लबमध्ये जुगार खेळला जात होता. तेथे टाकलेल्या धाडीत ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव, अविनाश जाधव यांच्यासह ४३ जणांना जुगार खेळतांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस शिपायांसह ४ जणांना अटक

येथील युवक राजाराम माने याने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर माने कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चे काढल्यामुळे पोलिसांनी या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पोलीस शिपाई भुजिंगा कांबळे यांच्यासह ३ संशयित आरोपींना अटक केली.

लैंगिक अत्याचाराची तक्रार देण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या नातेवाइकांना पोलिसांनी साडेसहा घंटे रात्री तिष्ठत ठेवले

तालुक्यातील एका ८ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना २५ नोव्हेंबरला घडली. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला आरोपी सुशिल गोविंद परब (वय ४५ वर्षे) याला न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी बजावली.

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ?

‘सुरक्षेसाठी पोलीस’ हे केवळ म्हणण्यापुरते राहिले असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणे आणि निरपराध जनतेवर अरेरावी करणे, तक्रारदारांसह उद्धट वर्तन करणे, कामचुकारपणा करणे, ही कीड राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांना लागली आहे.

जुन्या नोटा पालटून देण्याच्या निमित्ताने महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस अधिकार्‍यासह तिघांना अटक

पनवेल येथील मानसी उरणकर यांची १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी खारघर पोलिसांनी ठाणे पोलीस मुख्यालयातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शशांक तावडे यांच्यासह २ स्थावर मालमत्तेची दलाली करणार्‍यांना अटक केली.

पोलिसांनी छळ करून गुन्हा स्वीकार करण्यास बाध्य केले ! – बसवाहक अशोक कुमार

येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये ८ सप्टेंबरला ७ वर्षांच्या प्रद्युम्न याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी शाळेच्या बसचा वाहक अशोक कुमार याला हरियाण पोलिसांनी अटक केली होती

पोलीस कोठडीतील मृत्यूच्या घटना रोखण्यासाठी ७ वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती स्थापन

सांगलीत अनिकेत कोथळे याच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या प्रकरणी गृहविभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांची मंत्रालयात बैठक झाली.

जळगाव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘कलेक्शन’च्या वादातून हाणामारी

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोन कर्मचार्‍यांमध्ये ‘कलेक्शन’च्या आणि जुन्या वादातून हाणामारी झाली.

शेंगदाणे विक्रेत्यांकडून पैशांची वसुली करणारा पोलीस हवालदार निलंबित

बेंगळुरू – कर्नाटक पोलीस दलातील साहाय्यक पोलीस हवालदार मंडाक्की यांना बाजारपेठेतील शेंगदाणे विक्रेत्यांकडून पैशांची वसुली करत असल्यारून निलंबित करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात ३ पोलीस अधिकार्‍यांसह एकूण ५ पोलीस कर्मचारी निलंबित

नाशिक जिल्ह्यातील ३ पोलीस अधिकार्‍यांसह एकूण ५ पोलीस कर्मचार्‍यांना कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवून जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी १६ नोव्हेंबरला निलंबित केले.


Multi Language |Offline reading | PDF