मुंबई येथे चोरासमवेत संपर्क ठेवणार्‍या महिला पोलीस अधिकार्‍याला अटक !

मुंबई – मुंब्रा पोलीस ठाण्यामधील महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक कृपाल बोरसे  या भ्रमणभाषची चोरी करणारा चोर सबिर शेर अली सय्यद याच्यासमवेत आढळल्याने पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. (चोरासमवेत हातमिळवणी करून चोराला अभय देणार्‍या अशा पोलीस अधिकार्‍यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे. – संपादक)

एका तक्रारीनंतर खेरवाडी पोलिसांनी अन्वेषणाला प्रारंभ केल्यानंतर त्यांना संशयित आरोपी मुंब्रामधील असल्याचे लक्षात आले. त्याने भ्रमणभाषसंच चोरीचे गुन्हे विलेपार्ले भागातही केल्याचे समोर आले. आरोपी सबिर शेर अली सय्यद याला अटक करण्याचे दायित्व साहाय्यक पोलीस निरीक्षक कृपाल बोरसे यांना दिले होते; मात्र बोरसे यांनी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सय्यद याच्या घरी धाड टाकली. त्या वेळी सय्यद याच्यासमवेत ही महिला पोलीस अधिकारीही सापडली आहे.

संपादकीय भूमिका

अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते म्हणता येईल का ?