हणजूण (गोवा) येथील वेश्याव्यवसायाच्या प्रकरणी हवालदाराचे स्थानांतर

गोवा पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध असणे, महिलांचा विनयभंग करणे, भ्रष्टाचारातील सहभाग आणि आता वेश्याव्यवसायाला साहाय्य करणे हे सर्व गुन्हेगारीतील वाढते प्रकार पहाता पोलीस खात्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक ! मुख्यमंत्र्यांनी त्वरित योग्य ती कारवाई करणे अपेक्षित !

केनया येथील ५ पीडित युवतींची सुटका केल्यानंतर गोवा लैंगिक पर्यटनाचे प्रमुख ठिकाण बनल्याचे उघड !

छोट्याशा गोव्यात असे प्रकार चालू असतांना त्यांचा पोलिसांना थांगपत्ता नव्हता कि त्यांचेही साटेलोटे होते ? कॅसिनो, सनबर्न कार्यक्रम, आदी पाश्चात्त्य गोष्टींमुळे त्याच प्रकारचे संस्कारहीन पर्यटक गोव्यात येतात आणि अशी वेश्याव्यवसायाची ठिकाणे उभी रहातात, असे म्हटल्यास त्यात चूक ते काय ?

यवत (जि. पुणे) येथे ‘वरिष्ठ पोलीस अधिकारी’ असल्याचे सांगून महिलेवर ९ वर्षे अत्याचार !

धमकी देत ३५ लाख रुपये घेतले

गोवा : भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सेवेतून निलंबित !

गोवा पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध असणे, महिलांचा विनयभंग करणे आणि आता भ्रष्टाचारातील सहभाग हे सर्व गुन्हेगारीतील वाढते प्रकार पहाता पोलीस खात्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक बनले आहे ! मुख्यमंत्र्यांनी या गंभीर स्थितीची नोंद घेऊन त्वरित योग्य ती कारवाई करावी, ही अपेक्षा !

गोवा : म्हार्दोळ पोलीस निरीक्षकांचे प्राथमिक अन्वेषण करण्याचा पोलीस महासंचालकांचा आदेश

‘या घटनेत पुरावे नष्ट केले, चुकीची माहिती दिली, मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आदी सर्व प्रकार म्हार्दोळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत झाले, तरीही पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही.’ उच्च न्यायालयाच्या या टिपणीनंतर पोलिसांनी आदेश दिला आहे.

पोलीस हवालदाराकडून पोंबुर्पा येथील विवाहित महिलेचा विनयभंग

‘जनतेचे रक्षकच भक्षक बनले आहेत’, अशी प्रतिमा पोलिसांची बनत असून जनतेमध्ये पोलिसांविषयी अविश्वास निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन सरकारने पोलिसांना प्रशिक्षण देतांना साधनेद्वारे नैतिकता रुजवणे अपेक्षित आहे !

पुणे येथे महिला पोलिसावर पोलीस कर्मचार्‍याचा बलात्कार !

पोलीस विभागात महिला पोलीस असुरक्षित असणे दुर्दैवी आणि संतापजनक ! असा पोलीस विभाग सामान्य महिलांसाठी कधीतरी आधार वाटणारा ठरेल का ? वरिष्ठ पोलिसांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन संबंधितांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !

१५ लाखांची खंडणी मागणार्‍या पुणे येथील पोलीस कर्मचार्‍यावर गुन्हा नोंद !

पोलिसांचेच वर्तन असे असेल, तर कुणी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाईल का ? स्वतः लाच घेणारे पोलीस समाजात होणारी लाचखोरी आणि लूट कशी रोखणार ?

पोलीस तपासणी नाकी मलिदा खाण्यासाठीच आहेत का ? – बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष, सावंतवाडी

गोवा येथे हत्या करून तरुणीचा मृतदेह चारचाकीतून आंबोली येथे आणून घाटात फेकला जातो, याची कल्पना गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथील पोलिसांना नाही; मग अहोरात्र बांदा ते आंबोली या रस्त्यावर असणारे वाहतूक पोलीस झोपा काढत होते का ?

खोट्या बलात्काराच्या प्रकरणांत लोकांना अडकवून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करणार्‍या तरुणींच्या कारस्थानात पोलिसांचा सहभाग 

गोव्यातील पोलिसांचे गुन्हेगारीकरण होत आहे. पोलिसांच्या गुन्ह्यातील सहभागाची एकावर एक प्रकरणे उघड होत आहेत. हे त्वरित रोखणे आवश्यक आहे. हे असेच चालू राहिल्यास राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडून अराजक माजेल !