पणजी, २४ ऑगस्ट (वार्ता.) – चोरी आणि खंडणी वसुली प्रकरणी गुन्हेगारांशी संबंध असलेला पोलीस हवालदार विकास कौशिक याला गोवा पोलिसांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. गोवा पोलिसांनी पोलीस हवालदार विकास कौशिक याला सुमारे एक मासापूर्वी कह्यात घेतले होते आणि त्याला त्या वेळी सेवेतून निलंबित केले होते. एका मासाच्या आत पोलीस दलाने पोलीस हवालदार विकास कौशिक याला बडतर्फ केले आहे. पोलीस दलात जलद गतीने कारवाई झाल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.
सौजन्य न्यूज ऑफ गोवा
पोलिसांनी २४ वर्षीय आरोपी फैजान सय्यद याला कह्यात घेतल्यानंतर त्याने त्याचा अनेक चोर्यांमध्ये सहभाग असल्याचे सांगितले, तसेच पोलीस हवालदार विकास कौशिक याच्या सूचनेवरूनच या चोर्या करत असल्याचे सांगितले. आरोपी फैजान सय्यद याच्यासह अन्य आरोपींनी पोलीस हवालदार विकास कौशिक चोरलेल्या भ्रमणभाषच्या सीमकार्डच्या आधारे गुन्हेगारांच्या संपर्कात कशा प्रकारे होता, ते पोलिसांना अन्वेषणाच्या वेळी सांगितले. पोलीस हवालदार विकास कौशिक याचा गुन्ह्यांमध्ये कशा प्रकारे सहभाग होता याविषयी माहिती असलेला ४ पानांचा अहवाल पोलिसांनी सिद्ध केला आहे.
संपादकीय भूमिका
|