मुली आणि महिला यांचे अश्‍लील व्हिडिओ सिद्ध करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांच्या २ मुलांना पालघर येथून अटक !

कृत्रिम बुद्धीमतेचा केला गैरवापर !

पालघर – येथे कृत्रिम बुद्धीमतत्तेचा (‘आर्टिफिशियल अँटिलिजन्स’चा) गैरवापर करत अनेक मुली आणि महिला यांचे अश्‍लील व्हिडिओ सिद्ध करणार्‍या २ तरुणांंना अटक करण्यात आली. मुंबईत पोलीस अधिकारी असणार्‍यांच्या मुलांनी हे कृत्य केले. त्यांचे वय अनुक्रमे १९ आणि २१ वर्षे आहे. त्यांनी हे व्हिडिओ सिद्ध करून ते सामाजिक संकेतस्थळांवरही प्रसारित केले. या प्रकरणी २ मुलींनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. ज्या मुलींनी या तरुणांना विरोध केला, त्यांना तरुणांनी मारहाण केली. (तरुणांचा उद्दामपणा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आणि गुन्हेगारी न्यून करण्याचे दायित्व असणार्‍या पोलिसांनी स्वतःच्या मुलांच्या कृत्यांकडे किती लक्ष आहे ?, हेच यावरून लक्षात येते ! घरातील गुन्हेगारीही रोखू न शकणारे पोलीस समाजातील गुन्हेगारी काय रोखणार ?