नवी मुंबईतील वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

आरोपींना गुन्‍ह्यात साहाय्‍य केल्‍याचे प्रकरण

नवी मुंबई – पैसे दुप्‍पट करून देण्‍याचा अवैधरित्‍या फंड चालवणार्‍या आरोपींशी संपर्क ठेवणे, तसेच त्‍यांना गुन्‍ह्यात साहाय्‍य करणे या प्रकरणी वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील यांना निलंबित करण्‍यात आले. या दोघांनी आरोपींकडून पैसेही उकळले होते. नवी मुंबईचे पोलीस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांनी ही कारवाई केली आहे.

केवळ निलंबन नको, तर बडतर्फीची कारवाई हवी !