परात्पर गुरु डॉक्टरांनी सत्संगात संतसेवेचे महत्त्व सांगितल्यावर त्याविषयी साधिकेचे झालेले चिंतन !
‘संतांचे ईश्वराशी असलेले अनुसंधान, ईश्वराप्रतीचा भाव आणि तळमळ’ हे गुण पाहून साधकांना ‘आपल्यामध्येही हे गुण यावेत’, असे वाटू लागते आणि नकळत त्यांचे प्रयत्नही चालू होतात. संतसहवासात साधकाचे मन हळूहळू सकारात्मक होऊ लागते.