१९ मार्च २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातील काही निवडक सूत्रे पाहिली. आज या लेखमालेतील अंतिम सूत्र दिले आहे.
(भाग ६)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/894019.html

१७. समाजातील लोकांच्या टीकेकडे लक्ष देण्यापेक्षा जिज्ञासूचे शंकानिरसन करणे आणि योग्य मार्गाने साधना करत रहाणे आवश्यक !
साधक : ‘सनातन संस्था आणि अध्यात्म’ यांविषयी आम्हाला बरेच ठाऊक आहे; पण काही लोकांना ‘साधना आणि सूक्ष्म ज्ञान’ यांविषयी काहीच ठाऊक नसते. त्यामुळे समाजात हा विषय पटवून देतांना अवघड जाते. ‘प्रसारमाध्यमे, सभोवतालची परिस्थिती किंवा वातावरण पाहून ‘आपल्याला साधना करायला मिळेल कि नाही ?’ असा प्रश्न पडतो, इतका सगळीकडे गोंधळ आहे.’ मग आपण नेमके या गोष्टींकडे कसे बघावे ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : समाजात अनेक जण काही ना काही टीका करतच असतात. तिकडे लक्ष द्यायचे नाही. आपल्याला आपला मार्ग ठाऊक आहे. त्या मार्गाने आपण पुढे पुढे जायचे. इतरांचा विचार करू नये. एखाद्या जिज्ञासूने शंका विचारल्यास त्याच्या शंकेचे योग्य निरसन करायचे. ‘जिज्ञासू हा ज्ञानाचा अधिकारी आहे’, हे प.पू. भक्तराज महाराजांचे वाक्य आहे. (समाप्त)
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात. |