सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे दिली आहेत. २५.३.२०२५ या दिवशी या मार्गदर्शनातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे दिली आहेत.    

(भाग ४)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/895950.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१६. ‘रामनाथी आश्रमात आल्यावर ‘हिंदु राष्ट्र’ कसे असेल ?’, हे लक्षात आले’, असे साधकाने सांगणे

एक साधक : जेव्हा आम्ही सगळे साधक एकत्र येतो, तेव्हा आम्ही हिंदु राष्ट्राबद्दलच बोलतो. आमच्याकडे संभाजीनगरला पुष्कळ ठिकाणांना ‘दर्गा रोड’, ‘पीर बाजार’, अशी नावे आहेत. आम्ही म्हणतो, ‘‘हिंदु राष्ट्रात ही नावे ‘दुर्गा मार्ग’, ‘वीर बाजार’, अशी असतील.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हे सगळे लिहून द्या. महाराष्ट्रात सगळ्यांनाच कळेल आणि सगळीकडे असे करतील.

एक साधक : आमच्या मनातही सतत हिंदु राष्ट्राविषयीचे विचार असतात. ‘हिंदु राष्ट्र कसे असेल ?’, असा आम्ही केवळ विचारच करतो. ‘रामनाथी आश्रमात आल्यावर ‘हिंदु राष्ट्र’ कसे असेल ?’, हे माझ्या लक्षात आले.

१७. जगभरातील सर्व पंथांतील मानवांची साधना होण्यासाठी प्रार्थना केल्यावर व्यापकता येईल आणि अहं न्यून होण्यास साहाय्य होईल !

एक साधक : देवळात गेल्यानंतर माझ्याकडून पहिली प्रार्थना ‘हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’, यांसाठी होते अन् ‘प्रार्थना आपोआपच होते’, असे मला जाणवते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो. आपल्याला आता तिथेच थांबायचे नाही, तर सर्वत्र हिंदु धर्माचा प्रसार करायचा आहे; कारण नुसते भारतात हिंदु राष्ट्र येऊन भागणार नाही ! आपण सर्व मानवजातीचा विचार करायला हवा. आता अमेरिकेत जवळजवळ ६० टक्के लोकांना आयुष्यात एकदा तरी मनोविकार तज्ञांचे उपचार घ्यावे लागतात. त्यांना आजारासाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपचार मिळत नाही.

धर्मांध इतरांना ठार करून राग व्यक्त करतात. ते तर मनोवैज्ञानिकांकडे जात नाहीत. ते भावालाही मारतात ना ! औरंगजेब इत्यादींचा इतिहास काय आहे ? जगभरातील मानवाला जो आधार नाही, तो हिंदु धर्माने त्याला द्यायचा आहे. त्यांना सांगायचे आहे, ‘बाबांनो, साधना करा. तुम्हाला शांती मिळेल !’

जगभर जे मानव आहेत, त्यांना हिंदु धर्माची आवश्यकता आहे. आपल्या प्रार्थनेत तेही येऊ देत. आपल्या प्रार्थनेने ते होते, असे नाही; पण आपल्यात व्यापकत्व यायला हवे. ‘अमेरिकेतलेही माझे आहेत. ऑस्ट्रेलियातले माझे आहेत’, असा भाव प्रार्थनेने निर्माण होतो. ईश्वराला सर्व जग आपले वाटते. त्याला अनंत कोटी ब्रह्मांडे आपली वाटतात. आपल्याला निदान पृथ्वीवरचे मानव तरी आपले वाटू देत ! प्रार्थनेमुळे अहंभाव न्यून व्हायला लागतो. हे व्यापकत्व आहे.

१८. हिंदूंनी भक्ती आणि संघटन वाढवणे आवश्यक आहे !

एक साधक : एका गुंड मुलाने आमच्या गावातील एका मुलीला त्रास दिला. तेव्हा सभोवतालची माणसे आणि त्यांचे नातेवाईक घाबरून गप्प बसले. कुणीही प्रतिकार करायला पुढे आले नाही. तेव्हा मी गावातील मुलांचे प्रबोधन करून सर्वांना संघटित केले आणि त्या गुंडाला धडा शिकवला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : अशा प्रसंगात सर्वांना शिकायला मिळते ना ! गावोगावी असेच चालले आहे. यांच्यासारखी (या साधकासारखी) वृत्ती निर्माण व्हायला हवी; पण त्या आधी आपल्याला संघटन पुष्कळ वाढवायचे आहे. आपले संख्याबळ न्यून असले, तरी आपल्या संघटनेत भक्ती असल्यामुळे यश आपल्यालाच मिळणार आहे. त्यामुळे आपल्यामध्ये भक्ती आणि संघटन हे दोन्ही निर्माण व्हायला पाहिजे.

१९. सुख आणि आनंद यांतील भेद !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : एखाद्या कारणामुळे जे होते ते सुख आणि कारणाविना होतो, तो आनंद असतो. सच्चिदानंद हा पुष्कळ पुढचा असतो; पण ‘कृती करतांना सुख अनुभवता येणे’, हे महत्त्वाचे आहे.

२०. साधकांना ‘धर्मांतरणाविषयीचे प्रबोधन, म्हणजे ‘वाक्युद्ध’ करता यायला हवे !

एक साधक : एकदा मी घरून संभाजीनगरला जात असतांना माझ्या शेजारी एक आजोबा बसले होते. बोलता बोलता त्यांनी सांगितले, ‘‘मी मंदिरामध्ये सगळ्या देवतांना प्रार्थना करतो.’’ थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले की, ते ख्रिस्ती आहेत. पुढे त्यांनी सांगितले, ‘‘मला अर्धांगवायू झाला होता. प्रार्थना केल्यानंतर माझा अर्धांगवायू बरा झाला. प्रत्येक दिवस देवाने मला ‘बोनस’ दिला आहे.’’ त्यावर मी त्यांना विचारले, ‘‘धर्म पालटल्यानंतर रोगही बरे होतात का ?’’ ते ‘हो’ म्हणाले. मग मी म्हणालो, ‘‘बरे झाले. ख्रिस्त्यांना रोग होणारच नाहीत. पण मग ख्रिस्त्यांना तपासणीसाठी अमेरिकेत का जावे लागते ?’’ त्यानंतर मी म्हणालो, ‘‘माझ्या आजोबांना अर्धांगवायू झाला आहे. त्यांना घेऊन येतो. त्यांना बरे वाटले, तर आमच्या कुटुंबात १८ जण आहोत. सगळे धर्म पालटतो.’’ तेव्हा ते थरथर कापायला लागले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हे असे बोलता यायलाच पाहिजे. हे बोलण्यातले युद्ध. याला ‘वाक्युद्ध’, असे म्हणतात. प्रत्येक शब्दाला हजरजबाबीपणा आहे !

२१. धर्मांतरणाविषयीची वृत्ते त्या त्या वेळी ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात पाठवा !

एक साधक : मी बसने गावी चाललो होतो. तेव्हा एक मुलगा येऊन माझ्या बाजूला बसला. तो मूळचा हिंदू होता; पण तो धर्मांतरित होऊन ख्रिस्ती झाला होता. मला शांत बसलेले पाहून तो धर्माबद्दल बोलायला लागला आणि ‘माझे ऐकून घ्या’, असे म्हणाला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : बघा ते संधी मिळेल तसा प्रचार करतात.

एक साधक : मी त्याचे बोलणे ऐकून घेत होतो. त्याने मला सांगितले, ‘‘जर तुम्ही ख्रिस्ती धर्मात आलात, तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तुम्हाला पैसे मिळतील, तसेच कामही मिळेल.’’ मग तो हिंदूंच्या देवांविषयी नकारात्मक बोलू लागला. तेव्हा मला राग आला. मी त्याला सांगितले, ‘‘माझ्या देवांविषयी काही बोलू नकोस आणि मला शिकवूही नकोस. मी कट्टर हिंदू आहे.’’ मग तो गप्प बसला. तेव्हा माझी एक चूक झाली की, मी तेथील सर्व हिंदूंना बोलवायला हवे होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : येथे ‘तुम्ही लगेच हे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’ला पाठवले नाही, ही तुमची चूक झाली’ अशा प्रकारची वृत्ते प्रसिद्ध झाली, तर आपले सगळे साधक, वाचक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना प्रेरणा मिळते. सगळ्यांनीच अशा प्रकारची वृत्ते त्या त्या वेळी पाठवा !                                  (समाप्त)