तौते चक्रीवादळामुळे केरळ आणि तमिळनाडू राज्यांना अतीदक्षतेची चेतावणी !
तौते चक्रीवादळाचा धोका पश्चिम किनारपट्टीवर वाढल्याने केरळ आणि तमिळनाडू राज्यांना केंद्रीय जल आयोगाकडून अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. या दोन्ही राज्यांच्या किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.