पुणे – शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणार्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. शहरात बेकायदा वास्तव्य करणार्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत वास्तव्य करणारे परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करण्यात यावी, तसेच बांगलादेशी घुसखोर आढळून आल्यास त्वरित कारवाई करावी, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत, तसेच बांगलादेशी घुसखोरांना बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्या दलालांचाही शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. (घुसखोरांना सहजपणे आधारकार्ड आणि ओळखपत्र मिळते. पैशासाठी देशाच्या सुरक्षेचाही हे दलाल विचार करत नाहीत. यावरून भारतातील भ्रष्टाचार किती विकोपाला गेला आहे, हे लक्षात येते ! यावर आळा बसणे आवश्यक ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|