उत्तर कोरियामध्ये अन्नटंचाई निर्माण होण्याची शक्यता

नागरिकांना सतर्क रहाण्याचा हुकूमशाह किम जोंग उन यांचा आदेश !

पूर संरक्षक भिंतीचा निधी जलसंपदा अधिकार्‍यांनी घाईने अन्यत्र वळवू नये ! – ग्रामस्थांची मागणी !

प्रतिवर्षी कराड आणि पाटण तालुक्यातील ८१ गावे पूरग्रस्त होतात. तरीही अद्याप तेथे कोणतीही उपाययोजना केली गेलेली नाही.

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग गतीने होण्यासाठी आमचा प्रयत्न ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

अतीवृष्टी होऊन नद्यांना पूर आला, तर त्याविषयी विशेष काळजी घेतली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि महसूल विभाग आतापासून दक्ष आहे. कर्नाटक राज्याच्या आपण संपर्कात आहोत.

संभाजीनगर जिल्ह्यातील ‘आपत्ती व्यवस्थापन कक्ष’ आपत्तीला तोंड देण्यास असक्षम

जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘आपत्ती व्यवस्थापन कक्ष’ भंगार आणि नादुरुस्त साधनसामग्रीवर अवलंबून आहे. पुरेसे मनुष्यबळ तर नाहीच; पण जिल्ह्यात कुठेही आगीची घटना घडल्यास विभागाला महापालिकेच्या अग्नीशमन दलावर अवलंबून रहावे लागते.

पूर परिस्थिती टाळण्यासाठी नद्यांकाठची अतिक्रमणे हटवण्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आदेश !

पुराविषयी वडनेरे समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची कार्यवाही करावी अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. पुण्यातील सिंचन भवन येथे कृष्णा-भीमा खोर्‍यातील नद्यांना पावसाळ्यात येणारा पूर आणि धरणांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती टाळण्यासाठी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण ! – दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर 

दोन वर्षांपूर्वी आलेल्या पूर परिस्थितीचा अभ्यास करून मागील वर्षी धरणाच्या पाण्याचे आधीच नियंत्रण केले होते. यावर्षी त्याच पद्धतीने संभाव्य पूर नियंत्रणाचे नियोजन सर्व विभागांच्या समन्वयाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे आजर्‍यात (जिल्हा कोल्हापूर) शेतीसह कृषीपंपांची हानी

वादळामुळे गावातील काही घरांची पडझड झाली आहे. काही घरांवरील छपरांचे पत्रे उडणे, भिंतीला तडे जाणे, भिंती कोसळणे अशा घटनाही घडल्या आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणार्‍या मानसिक समस्यांवरील काही उपाययोजना

प्रतिकूल परिस्थिती मध्ये मन अस्थिर होणे, मनावर ताण येणे, परिस्थिती स्वीकारता न येणे इत्यादी त्रास होतात अशावेळी परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी करायच्या उपाययोजना येथे सांगितल्या आहेत.

तौते चक्रीवादळामुळे केरळ आणि तमिळनाडू राज्यांना अतीदक्षतेची चेतावणी !

तौते चक्रीवादळाचा धोका पश्‍चिम किनारपट्टीवर वाढल्याने केरळ आणि तमिळनाडू राज्यांना केंद्रीय जल आयोगाकडून अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. या दोन्ही राज्यांच्या किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भर उन्हाळ्यात नद्यांना पूर

जिल्ह्याच्या काही भागांत ९ मे या दिवशी विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. धारूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या, नाल्यांना पूर आला होता.