१० वी आणि १२ वीच्या परीक्षा केंद्रांवर संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी नसतील !

मुंबई – दहावी आणि बारावी यांच्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील, त्या केंद्रांवर त्या शाळेचे शिक्षक किंवा कर्मचारी नेमले जाणार नाहीत. इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक आणि इतर कर्मचारी नेमावेत, असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागीय मंडळास दिले आहेत.

बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत २० ते २६ जानेवारी या काळात ‘कॉपीमुक्त अभियानासाठी जनजागृती सप्ताहा’चे आयोजन केले आहे.