इंडोनेशियामध्ये पूर आणि भूस्खलन यांमुळे आतापर्यंत १४० हून अधिक जणांचा मृत्यू

जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियातील पूर्व भागात पूर आणि भूस्खलन यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १४० हून अधिक झाली, तर मोठ्या संख्येने लोक बेपत्ता आहेत. येथे सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने बेपत्ता लोकांच्या शोधामध्ये अडथळे येत आहेत. अदोनारा बेटावरील पूर्व फ्लोरेस जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मनुष्यहानी झाली आहे. येथे झालेल्या भूस्खलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला. लेम्बाता बेटावर ‘सेरोजा’ चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील ज्वालामुखीतील लाव्हा रस वेगाने बाहेर आल्यामध्ये १२ हून अधिक गावांमध्ये हाहा:कार माजला. यात ३२ जणांचा मृत्यू झाला, तर ३५ जण बेपत्ता आहेत.