आता निधर्मीवादी गप्प का ?
साजिद आणि वाजिद या संगीतकार बंधूंपैकी दिवंगत वाजिद खान यांची पारशी पत्नी कमलरुख खान यांनी त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला होता, अशी माहिती देत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचे समर्थन केले आहे.
साजिद आणि वाजिद या संगीतकार बंधूंपैकी दिवंगत वाजिद खान यांची पारशी पत्नी कमलरुख खान यांनी त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला होता, अशी माहिती देत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचे समर्थन केले आहे.
‘लव्ह जिहाद’ एक राजकीय स्टंट आहे. मी मुसलमान तरुणांना आवाहन करतो की, छळापासून वाचायचे असेल, तर त्यांनी हिंदु तरुणींना बहीण मानावे, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते एस्.टी. हसन यांनी लव्ह जिहादविरोधी कायद्यापासून वाचण्यासाठी केले.
लाचखोरीच्या संदर्भात आशिया खंडातील देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. भारतात लाचखोरीचा दर ३९ टक्के आहे.
‘नेटफ्लिक्स’वर दिवाळीत प्रदर्शित झालेल्या ‘लुडो’ या चित्रपटात हिंदु देवतांना बहुरूप्यांच्या रूपात दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. ब्रह्मा, विष्णु, शंकर, महाकाली आदी देवतांचा अवमान करण्यात आला आहे.
तमिळनाडू हिंदु महासभेचे राज्य सचिव नागराज यांची होसूर येथील आनंदनगरातील त्यांच्या घराजवळ अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली. काही मासांपूर्वी नागराज यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी करूनही पोलिसांनी ती नाकारली होती.
कोची (केरळ) येथील सायरो मलबार चर्चच्या येथील कदवंथरा सेंट जोसेफ चर्चमध्ये मुसलमान तरुण आणि ख्रिस्ती तरुणी यांचा विवाह झाला होता. यावरून झालेल्या वादामुळे विवाह करून देणार्या पाद्य्राला क्षमा मागावी लागली.
‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या ‘अ सुटेबल बॉय’ या वेब सिरीजमध्ये एका मंदिराच्या परिसरामध्ये मुसलमान तरुण हिंदु तरुणीचे चुंबन घेतांनाचे दृश्य दाखवण्यात आले आहे. तसेच यातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले आहे.
हसनपूर (कर्नाटक) येथील डोड्डागडावल्ली चतुशकुता मंदिरातील श्री महाकालीदेवीची मूर्ती अज्ञातांकडून तोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हे मंदिर वर्ष १११३ मध्ये होयसल वंशातील राजा विष्णुवर्धन याच्या शासनकाळात बांधण्यात आले आहे.
राजस्थानचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणतात, ‘‘धार्मिक सौहार्द बिघडवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ या शब्दाची निर्मिती भाजपद्वारे करण्यात आली आहे. अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी कायदा आणणे हे राज्यघटनाविरोधी आहे.’’
नगरोटा (जम्मू-काश्मीर) येथे १९ नोव्हेंबरच्या पहाटे बान टोल नाक्यावर आलेल्या एका ट्रकमधून आतंकवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार केला. या वेळी ३ घंटे झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले.