शत्रूराष्ट्र चीनच्या कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या साम्यवादी नेत्यांच्याविरोधात शासनाने फौजदारी खटले प्रविष्ट करावेत ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय

वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची साम्यवाद्यांची जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी आताही आहे आणि पुढेही तीच राहील.

भारताने पाकच्या उच्चायुक्तालयातील अधिकार्‍याला जाब विचारला !

पाकमध्ये गणपति मंदिराच्या तोडफोडीचे प्रकरण
मंदिराचा जीर्णोद्धार करू ! – पंतप्रधान इम्रान खान

भारत ऑगस्टमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा एका मासासाठी अध्यक्ष होणार !

आतंकवादाच्या विरोधात ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न करणार !

(म्हणे) ‘लडाखमध्ये भारताने घुसखोरी केली !’

स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत एकाही शासनकर्त्याने चीनला ‘जशास तसे’ उत्तर न दिल्याने तो भारताच्या संदर्भात वाटेल ते बोलतो आणि वाटेल तसे वागतो ! हे आजपर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

केजरीवाल देहलीचे मुख्यमंत्री असल्याने त्यांचे मत देशाचे मत नाही ! – भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे सिंगापूरकडे स्पष्टीकरण

अरविंद केजरीवाल हे देहलीचे मुख्यमंत्री असल्याने त्यांचे मत हे देशाचे मत नाही, असे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी सिंगापूरला स्पष्ट केले.

वंशसंहार : आर्मेनियन्सचा आणि हिंदूंचा !

ख्रिस्ती आर्मेनियन लोकांच्या वंशविच्छेदाविषयी ख्रिस्ती अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेतून भारताने शिकावे आणि स्वतःची परराष्ट्रनीती हिंदुत्वाला केंद्रभूत ठेवून आखावी.

भारतियांची चीनविरुद्धची मवाळ नीती पालटायला हवी ! – अभिजित अय्यर-मित्रा, संरक्षण आणि विदेशनीती विशेषतज्ञ

व्हिएतनामसारखे राष्ट्र चीनला अनेक वेळा नमवते. आपण भाषण देण्यामध्ये चांगले असण्यापेक्षा रणनीती चांगली करण्यामध्ये प्रयत्न करायला हवेत.

अरबी समुद्रातील ‘एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन’मध्ये अमेरिकेच्या युद्धनौकेची घुसखोरी

भारताने अमेरिकेच्या या दादागिरीला भीक न घालता त्याला जाब विचारायला हवा ! भारताने चीन आणि पाक यांच्यासह आता अमेरिकेलाही धाकात ठेवायला हवे, हे यावरून लक्षात येते ! असा देश भारताचा कधीतरी मित्र राष्ट्र होऊ शकतो का ?

(म्हणे) ‘भारत आणि चीन मित्र असल्याने एकमेकांसाठी धोकादायक नाहीत !’ – चीनचे परराष्टमंत्री वांग यी

वांग यी यांनी म्हटलेले हे वाक्य अर्धसत्य आहे ! भारत चीनसाठी धोकादायक नाही; मात्र चीन भारतासाठी धोकादायक आहे. चीन कधीही भारताचा मित्र होऊ शकत नाही.

मुंबईच्या वीजप्रणालीद्वारे सायबर आक्रमण करणार्‍या चीनला ‘जशास तसे’ उत्तर देणे आवश्यक !

आपली आक्रमण करण्याची तीव्रता ही चीनहून अधिक हवी. आपल्याकडे असलेल्या क्षमतेचा वापर करून ‘सायबर सर्जिकल स्ट्राईक’ केले पाहिजेत. ज्या स्तरावर चीनने भारतावर आक्रमण केले, त्याच स्तरावर भारतानेही उत्तर द्यायला पाहिजे.