आतापर्यंत चीनचा विस्तार झाला, तो कॅपिटॅलिस्ट (भांडवलशाही) पद्धतीमुळे; परंतु त्यांची वैयक्तिक नीती ही मर्केंटालिस्ट (व्यापारशाही) राहिली आहे. पश्चिमी देश म्हणजे चीनचे मुख्य केंद्र आहेत. आपण चीनचे आर्थिक केंद्र बंद करत असल्याने चीनचे भारताकडे लक्ष आहे. प्रत्यक्ष नाही; मात्र अप्रत्यक्षरित्या चीन तिसर्या महायुद्धाचे कारण होऊ शकतो. भारतातही असे लोक आहेत की, जे चीनशी जोडलेले आहेत. ‘चलता है’ अशी भारतियांची मवाळ नीती आता पालटायला हवी. व्हिएतनामसारखे राष्ट्र चीनला अनेक वेळा नमवते. आपण भाषण देण्यामध्ये चांगले असण्यापेक्षा रणनीती चांगली करण्यामध्ये प्रयत्न करायला हवेत.