आतंकवादाच्या विरोधात ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न करणार !
नवी देहली – ऑगस्टमध्ये भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष होणार आहे. सुरक्षा परिषदेचा प्रत्यक्ष सदस्य देश एका मासासाठी परिषदेचा अध्यक्ष बनतो. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे वाढते प्रस्थ, तसेच जागतिक स्तरावर पालटता घटनाक्रम पहाता भारताचे अध्यक्षपद महत्त्वाचे मानले जाते. भारतीय परराष्ट्र मंत्रालय धोरण निश्चित करत आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर म्हणाले, ‘‘भारत आंतरराष्ट्रीय आतंकवादाच्या विरोधात प्रभावी पावले उचलण्यासाठी ठोस प्रयत्न करील.’’