‘सह्याद्री’कुशीत ‘तिवरे’ गावी पर्यावरण मंडळाने अनुभवल्या ‘श्रावण’सरी

श्रावणात निसर्गाचे सुंदर दर्शन होते. फुलांचा रंगोत्सव पहायला मिळतो. आपल्या पूर्वजांनी निसर्गाचे महत्त्व जाणून पर्यावरण, निसर्ग संरक्षण, मानवी स्वास्थ्य आणि आरोग्य यांचा सुरेख संगम साधला आहे.

व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करून म्हादई वाचवा ! – प्रा. राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ

म्हादई जलविवाद लवादाने कर्नाटकला पाणी वळवण्यासाठी पर्यावरण आणि वन्यजीव अनुज्ञप्ती घेणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. म्हादई व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित झाल्यास कर्नाटकला या अनुज्ञप्ती मिळणे कठीण होणार आहे.

गोवा : खाण क्षेत्रातील गावांतील नागरिकांची पुन्हा जनसुनावणी घेण्याची मागणी

नागरिकांना अंधारात ठेवून खाण व्यवसाय रेटला जात आहे. गेल्या ५० वर्षांत खाणींमुळे सुपीक भूमी आणि जलस्रोत नष्ट झाले. त्यामुळे पुढील ५० वर्षांत आणखी किती हानी होईल ?, याची कल्पनाच करू शकत नाही.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या उपद्रवामुळे संतप्त शेतकरी १० ऑगस्टला आंदोलन करणार !

शासनाने यावर उपाययोजना करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीद्वारे त्याचे दृश्य परिणाम अद्याप दिसत नसून हत्तींकडून हानी करणे चालूच आहे. हत्तींचा उपद्रव थांबवू न शकणारे प्रशासन जनतेच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे का ?

गोवा : न्यायालयात कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा व्याघ्रक्षेत्र घोषित करा !

लोकभावनेचा विचार करून उच्च न्यायालयाने सरकारला ३ मासांत म्हादई अभयारण्य व्याघ्र क्षेत्र घोषित करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाची मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी.

अल्‍प होत असलेले वनक्षेत्र हे वन्‍य प्राण्‍यांच्‍या समस्‍येचे मूळ कारण ! – वनमंत्री

गाय, म्‍हैस, बैल आदींचा वन्‍य प्राण्‍यांच्‍या आक्रमणात मृत्‍यू झाल्‍यास देण्‍यात येणारे १० सहस्र रुपयांचे साहाय्‍य आता ७० सहस्र रुपयांपर्यंत करण्‍यात आले आहे.

चिपळूण येथील पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांना ‘पर्यावरण दूत’ पुरस्कार प्रदान

पुरस्कार स्वीकारल्यानंतर सह्याद्री वाहिनीशी संवाद साधतांना श्री. धीरज वाटेकर यांनी, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पर्यावरणनीती आजही मार्गदर्शक, असल्याचे नमूद केले.

इरशाळवाडीसारख्‍या घटनांना मानवी हस्‍तक्षेपही कारणीभूत ! – डॉ. माधव गाडगीळ

डॉ. गाडगीळ यांच्‍यासारख्‍या तज्ञांच्‍या अहवालांचा अभ्‍यास करून त्‍यानुसार शासनाने कृती करावी, ही अपेक्षा !

सोलापूर विद्यापिठात २४ जुलैला होणार ‘पर्यावरण दूत’ धीरज वाटेकर यांचा सन्मान

वाटेकर हे कोकण इतिहास आणि संस्कृती, निसर्ग आणि पर्यावरण, ग्रंथ चळवळ, पर्यटन, आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत.

पर्यावरणद्रोहींवर कारवाई करण्‍यासाठी ठाकरे पक्षाची वन विभागासमोर निदर्शने!

गांधीनगर बाजारपेठेतील जे लोक दुकानासमोरील वृक्ष कचरा पेटवून नष्‍ट करतात आणि जे लोक आम्‍ल टाकून वृक्ष नष्‍ट करतात, अशा पर्यावरणद्रोही लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच जे वृक्ष सध्‍या डौलाने उभे आहेत, त्‍यांची गणना करून त्‍यावर क्रमांक टाकून त्‍यांच्‍या संवर्धनाचे दायित्‍व निश्‍चित करण्‍यात यावे, या मागणीसाठी ठाकरे पक्षाच्‍या वतीने वन विभागासमोर निदर्शने करण्‍यात आली.