वर्धनगडावरील (सातारा) दर्ग्‍याभोवतीचे अनधिकृत बांधकाम हटवले !

शेकडो पोलिसांच्‍या बंदोबस्‍तात वन विभागाच्‍या अधिकार्‍यांनी अनधिकृत बांधकाम हटवण्‍याची कारवाई केली. शांतता, कायदा आणि सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी गडावर जाणारे सर्व रस्‍ते बंद करण्‍यात आले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत ही कारवाई पूर्ण करण्‍यात आली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत विदेशी झाडे लावण्यास पर्यावरणप्रेमींनी केला विरोध !

विदेशी झाडे लावून केवळ सौंदर्यवाढीसाठी नव्हे, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्थानिक झाडे लावणे आवश्यक आहे, हे महमार्ग विभागाला केव्हा  समजणार ?

पवनी (जिल्‍हा नागपूर) येथे दोघांना ठार मारणार्‍या वाघाचा बंदोबस्‍त न केल्‍याने ग्रामस्‍थांचे वनकर्मचार्‍यांवर आक्रमण !

२ दिवसांपूर्वी याच परिसरातील गुडेगाव येथील एकाला वाघाने ठार केले होते. त्‍यामुळे अगोदरच ग्रामस्‍थांमध्‍ये वन विभागाच्‍या विरोधात असंतोष होता.

वन विभागाचा तपासणी नाका चालू झाल्‍याने रात्रीच्‍या वेळी सिंहगडावर जाणार्‍यांना चाप !

भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी सांगितले की, सायंकाळी साडेसहा ते सात वाजल्‍यानंतर कोंढणपूर फाट्यावरून गडाकडे जाणारा दरवाजा बंद करण्‍यात येतो. याठिकाणी कर्मचारी तैनात करण्‍यात आले आहेत.

तिवरे (चिपळूण) गावात दीडशे ‘वृक्षरोप’ लागवड अभियान

‘सह्याद्री’ची संपत्ती बोलणारी नसली, तरी भरपूर देणारी आहे. पिढ्यान्‌पिढ्या आपल्यावर या वृक्षराजीचे उपकार आहेत. तिची तोड न करता संरक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व आपले सर्वांचे आहे.

‘नासा’च्या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेल्या समुद्राच्या वाढत्या स्तरावर जागतिक चिंता व्यक्त !

गेल्या वर्षी युरोपमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे १५ सहस्त्र लोकांचा मृत्यू झाला होता. एका वैज्ञानिकाच्या मतानुसार वर्ष २०६० पर्यंत अशा प्रकारचेच भयावह हवामान रहाणार आहे.

रत्नागिरी नगर परिषदेचा पहिला क्रमांक  : १ कोटी ५० लाख रुपयांचे मिळाले पारितोषिक !

शासनाकडून गेल्या वर्षी माझी वसुंधरा अभियान ३.० राबवण्यात आले. या अभियानामध्ये पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वअंतर्गत केलेल्या कामाचे मूल्यांकन करण्यात आले.

तिवरे (तालुका चिपळूण) गावात बीजारोपण आणि रोपवाटिका निर्मितीसाठी ५० सहस्र बीजप्रदान  !

विविध कारणांनी ब्रिटीशांच्या काळात देवरायांची, जंगलांची अधिकची तोड चालू झाली, ती आजही चालू आहे. तिचे परिणाम आपण अनुभवतो आहोत. म्हणून देशी जंगली वृक्षांचे बीजारोपण आणि वृक्षारोपण काळाची आवश्यकता आहे.

सावंतवाडी शहरातील पाणीटंचाई प्रशासन निर्मित ! – नागरिकांची प्रशासनावर टीका

उपाययोजना काढण्यासाठी जनतेला का सांगावे लागते ?

 जिल्ह्यात जागतिक पर्यावरणदिनानिमित्त गावागावांत श्रमदानातून प्लास्टिक संकलन मोहीम

जिल्हा परिषद पाणी स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने ५ जून या दिवशी १ सहस्र ५३२ गावांमध्ये प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवण्यात आली.