रायगड आणि नाशिक यांच्या पालकमंत्रीपदाच्या घोषणेला स्थगिती
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या घोषणेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महारस्ता रोखून आंदोलन केले. शिवसैनिक अप्रसन्न असल्याचे यातून दिसून आले.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या घोषणेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महारस्ता रोखून आंदोलन केले. शिवसैनिक अप्रसन्न असल्याचे यातून दिसून आले.
सीसीटीव्हीमध्ये दिसलेला तरुण आणि कह्यात घेतलेला संशयित यांच्या चेहर्यात साम्य आहे; पण तो आरोपी असल्याचे सिद्ध झालेले नाही .
प्रत्येक रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाची माहिती घेणारी ‘ट्रॅकिंग सिस्टिम’ कार्यरत केली जाणार आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीचे आधुनिकीकरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार !
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक आणि अर्थतज्ञ गमावला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारताच्या राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
२ सहस्र १०० रुपये २ मासांनी मिळण्याची शक्यता
महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन १ महिना झाल्यानंतर २१ डिसेंबर या दिवशी महायुती सरकारचे खातेवाटप घोषित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह मंत्रालयासह ऊर्जा, विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, तसेच माहिती आणि जनसंपर्क विभाग हे विभाग स्वतःकडे ठेवले आहेत.
ज्यांना मंत्रीपद दिले त्यांच्यात क्षमता आहे आणि ज्यांना दिले नाही त्यांच्यात क्षमता नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. आमच्याकडे आमदारांची संख्या अधिक आहे. काही वेळा काही लोकांना श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते.
अडीच वर्षे महाराष्ट्राच्या कायापालटाला प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतांनाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
निरपेक्ष भावनेने काम कसे करावे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराकडून शिकावे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करतो. पुढच्या वर्षी २०२५ मध्ये संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत, हेसुद्धा विशेष आहे.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याच्या कटाची ‘क्लीप’ विधान परिषदेत सादर !