मुंबईतील ३ पोलीस ठाण्यांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाहन स्फोटाने उडवण्याच्या धमक्या !

गोरेगाव, जे.जे. मार्ग आणि मंत्रालय या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाहन स्फोटाने उडवून देण्याच्या धमक्या ईमेलद्वारे देण्यात आल्या आहेत.

पक्ष मोठा करायचा असेल, तर कार्यकर्त्यांना बळ द्या !

शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेनेत कुणीही मालक नाही. राजाचा मुलगा राजा नाही, तर जो काम करेल, तो राजा बनेल, असा शिवसेना पक्ष आहे.

एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यात अनधिकृतरित्या ड्रोन उडवणारा कह्यात !

एका पोलिसाने अनधिकृतरित्या ड्रोन उडवले. या प्रकरणी पोलिसाला कह्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी चालू आहे.

Eknath Shinde visits Malang Gad : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीक्षेत्र मलंगगडावर आरती !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी मलंगमुक्तीची घोषणा दिली होती. त्यानंतर प्रतीवर्षी माघ पौर्णिमेला शिवसेनेच्या वतीने श्रीक्षेत्र मलंगगडावर आरती केली जाते. यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली.

एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव’ पुरस्कार !

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

ह.भ.प. कै. शिरीष महाराज मोरे यांचे कर्ज फेडण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे साहाय्य !

देहूमधील कीर्तनकार ह.भ.प. कै. शिरीष महाराज मोरे यांनी गेल्याच आठवड्यात आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्यांच्यावर ३२ लाखांचे कर्ज झाले असून ते फेडणे शक्य होत नसल्याने ते टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते

एकनाथ शिंदे यांचा हिरक महोत्‍सवी वाढदिवस ‘श्री एकनाथ आध्‍यात्मिक सेवा वर्ष’ म्‍हणून साजरा करण्‍यात येणार !

शिवसेना नेते तथा उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिरक महोत्‍सवी वाढदिवस ‘श्री एकनाथ आध्‍यात्मिक सेवा वर्ष’ म्‍हणून साजरा करण्‍यात येणार आहे. ‘शिवसेना धर्मवीर आध्‍यात्मिक सेने’कडून याविषयी घोषणा करण्‍यात आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे भाविकांनी दिलेले दान मंदिर निर्माणासाठी वापरले जाणार !

त्र्यंबकेश्वर येथे वारकरी संवाद कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी बांधवांशी संवाद साधला !

अध्यात्म आणि वैदिक तत्त्वज्ञानातील तेजोमय दीपस्तंभ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

अध्यात्म, वैदिक ज्ञान परंपरेचा निस्सीम साधक म्हणून गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांची कार्यसाधना पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी तेजोमय राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.

गिरीश महाजन आणि अदिती तटकरे

रायगड आणि नाशिक यांच्या पालकमंत्रीपदाच्या घोषणेला स्थगिती

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या घोषणेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महारस्ता रोखून आंदोलन केले. शिवसैनिक अप्रसन्न असल्याचे यातून दिसून आले.