अभिनेते सैफ अली खान यांच्यावरील आक्रमण प्रकरण

मुंबई – अभिनेते सैफ अली खान यांच्यावरील आक्रमण प्रकरणात एका संशयिताला कह्यात घेण्यात आले आहे; पण तो आरोपी असल्याचे स्पष्ट झालेले नाही. चौकशीअंती ते सिद्ध होईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. सीसीटीव्हीमध्ये दिसलेला तरुण आणि कह्यात घेतलेला संशयित यांच्या चेहर्यात साम्य आहे; पण तो आरोपी असल्याचे सिद्ध झालेले नाही, असेही ते म्हणाले. संशयिताला गिरगाव येथून कह्यात घेतले असून त्याचे नाव शाहीद असल्याचे समजते.
अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळजी घेऊ ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
कलावंतांवर अशी आक्रमणे होणे गंभीर आहे. पोलीस मुळाशी जात आहे. प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेचे दायित्व आमचे आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याची काळजी आम्ही घेऊ.