ह.भ.प. कै. शिरीष महाराज मोरे यांचे कर्ज फेडण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे साहाय्य !

ह.भ.प. कै. शिरीष महाराज मोरे आणि एकनाथ शिंदे

पुणे – देहूमधील कीर्तनकार ह.भ.प. कै. शिरीष महाराज मोरे यांनी गेल्याच आठवड्यात आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्यांच्यावर ३२ लाखांचे कर्ज झाले असून ते फेडणे शक्य होत नसल्याने ते टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते, तसेच त्यांच्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य करण्याची आर्त विनवणी त्यांनी या पत्रातून सर्व मित्रमंडळींना केली होती. त्यांच्या याच विनवणीला साद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबाला ३२ लाख रुपयांचे साहाय्य देण्याचा निर्णय घेतला असून आमदार विजय शिवतारे यांना तातडीने हे साहाय्य ह.भ.प. कै. शिरीष महाराज मोरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना सुपुर्द करण्यास सांगितले आहे.