मुंबईतील ३ पोलीस ठाण्यांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाहन स्फोटाने उडवण्याच्या धमक्या !

मुंबई – गोरेगाव, जे.जे. मार्ग आणि मंत्रालय या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाहन स्फोटाने उडवून देण्याच्या धमक्या ईमेलद्वारे देण्यात आल्या आहेत. ईमेलच्या ‘आयपी लोकेशन’च्या आधारे धमकीचा मेल कुठून आणि कुणी केला ? याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

शिंदे यांना ठार मारण्याची धमकी

उपमुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी यापूर्वीही पोलीस ठाण्यात दूरभाष करून एका युवकाने दिली होती; मात्र धमकी देणार्‍या युवकाचा शोध घेतल्यावर तो मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. या व्यतिरिक्त यापूर्वीही काही राजकीय नेत्यांना ठार मारण्याच्या धमक्या आल्या आहेत; मात्र यामध्ये तथ्य आढळले नाही. असे असले, तरी या प्रकरणात ३ पोलीस ठाण्यांत आलेल्या धमक्यांविषयी पोलिसांनी तातडीने अन्वेषण चालू केले आहे.