एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यात अनधिकृतरित्या ड्रोन उडवणारा कह्यात !

‘ड्रोन’चे प्रतिकात्मक चित्र

नाशिक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे दौरा चालू होता. त्या वेळी एका पोलिसाने अनधिकृतरित्या ड्रोन उडवले. या प्रकरणी पोलिसाला कह्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी चालू आहे.