स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवणार !
उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाने राज्याच्या अभ्यासक्रमात पालट केला आहे. आता पाठ्यपुस्काद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवण्यात येणार आहे.
उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाने राज्याच्या अभ्यासक्रमात पालट केला आहे. आता पाठ्यपुस्काद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवण्यात येणार आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तानसाठीच्या दूत रोझा ओटुनबायेवा यांनी तालिबान शासकांना सांगितले आहे की, महिला आणि मुली यांना शिक्षण मिळण्यावर लादण्यात आलेली बंधने हटवल्याविना त्यांच्या देशातील सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे अशक्य आहे.
भारतातील मुसलमानांनी स्वतःला ‘पीडित’ दाखवण्याच्या मानसिकतेतून बाहेर यायला हवे आणि शिक्षणावर लक्ष द्यायला हवे, असे आवाहन भारतीय उद्योगपती तथा ‘मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिर्व्हसिटी’चे माजी कुलगुरु जफर सरेशवाला यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना केले.
सरकारने अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !
पाकिस्तानात भविष्यात हिंदूच शिल्लक ठेवले जाणार नाहीत. त्यामुळे तेथे हिंदूंचे कोणतेही सण साजरे होणार नाही, ही स्थितीही लवकर आल्यास आश्चर्य वाटू नये !
भारतीय स्वावलंबी न होता कायम गुलाम रहावेत, अशी शिक्षणपद्धत इंग्रजांनी निर्माण केली. अशा प्रकारच्या शिक्षणपद्धतीने इंग्रजांनी भारतियांचा कणा मोडून टाकला. भारतीय शिक्षण मोक्षप्राप्तीसाठी दिशा देणारे आहे.
ओडिशामध्ये आम्ही वनवासींकडून ३० सहस्र पोथ्या एकत्र केल्या त्या पोथ्यांमध्ये विमानांची निर्मिती कशी करावी ?, मंदिरांचे बांधकाम कसे करावे ? आदी प्रत्येक विषयावर विवरण देण्यात आले होते.
डॉ. ठाकूर यांनी भांबेडमधल्या घराच्या आवारात बारा एकर जमिनीवर, सुमारे १७०० हून अधिक वेगवेगळ्या वनस्पती जोपासत वनस्पतीशास्त्राचे जागतिक संदर्भ असलेले उत्कृष्ट ‘बॉटनिकल गार्डन’ फुलविले आहे.
जी-२० शिक्षण कार्यगटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावर दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद़्घाटन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री श्रीमती अन्नपूर्णादेवी यांनी केले.
‘रोटरी क्लब विभाग सांगली’ येथे चित्पावन परिवार सांगली यांच्या वतीने नुकतेच १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक धोरणासंबंधी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.