भारतीय मुसलमानांनी स्वतःला ‘पीडित’ दाखवण्याच्या मानसिकतेतून बाहेर यायला हवे ! – उद्योगपती जफर सरेशवाला

उद्योगपती जफर सरेशवाला

जेद्दा (सौदी अरेबिया) – भारतातील मुसलमानांनी स्वतःला ‘पीडित’ दाखवण्याच्या मानसिकतेतून बाहेर यायला हवे आणि शिक्षणावर लक्ष द्यायला हवे, असे आवाहन भारतीय उद्योगपती तथा ‘मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिर्व्हसिटी’चे माजी कुलगुरु जफर सरेशवाला यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना केले. ‘आपल्याला आपल्या हिंदु बंधू-भगिनींशी बोलले पाहिजे आणि त्यांच्यासमोर आपली प्रतिमा चांगली केली पाहिजे. जोपर्यंत आपण असे करणार नाही, तोपर्यंत संघर्ष चालूच राहील’ असेही त्यांनी सांगितले.

जफर सरेशवाला पुढे म्हणाले की, भारतात मुसलमानांशी भेदभाव केला जातो; मात्र तो काही घटकांकडून केला जातो. आपण सतत आंदोलन करू शकत नाही. जग पुढे चालले आहे. आता केवळ पदवी प्राप्त करण्यापुरते सीमित रहाता येणार नाही, तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रात तज्ञ व्हावे लागणार आहे. भारतातील मुसलमानांनी स्पर्धा परीक्षांमध्ये (नागरी सेवा परीक्षांमध्ये) भाग घेतला पाहिजे. जर ते या स्पर्धेमध्ये सहभागी झाले नाहीत, तर ते जिंकण्याची अपेक्षा कशी करू शकता?