महिलांवरील निर्बंध हटवत नाही, तोपर्यंत तालिबान सरकारला मान्यता नाही !

संयुक्त राष्ट्रांची भूमिका

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तानसाठीच्या दूत रोझा ओटुनबायेवा यांनी तालिबान शासकांना सांगितले आहे की, महिला आणि मुली यांना शिक्षण मिळण्यावर लादण्यात आलेली बंधने हटवल्याविना त्यांच्या देशातील सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे अशक्य आहे.
ओटुनबायेवाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सांगितले की, तालिबान शासकांनी ‘तालिबान सरकारला संयुक्त राष्ट्रांतील १९२ देशांनी मान्यता द्यावी’, अशी विनंती केली आहे; मात्र ते संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावांच्या विरोधात काम करत आहे. संयुक्त राष्ट्रांकडून अनेकदा आवाहन केल्यानंतरही तालिबानने महिलांवरील निर्बंध हटवलेले नाहीत.