बुलढाणा येथील मेहकर महाविद्यालयाचे संकेतस्थळ अज्ञाताने ‘हॅक’ करून त्यावर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिहिले !

(‘हॅक’ करणे म्हणजे नियंत्रण मिळवणे)

मेहकर (जिल्हा बुलढाणा) – येथील ‘मेहकर एज्युकेशन सोसायटी’द्वारे संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे संकेतस्थळ अज्ञातांनी ‘हॅक’ करून त्यावर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिहिले, तसेच काही आक्षेपार्ह लिखाणही प्रसारित केले. ‘सायबर सेल’ने पोलिसांना याची माहिती दिली. महाविद्यालय प्रशासनाने हे संकेतस्थळ बंद केले असून या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. या शिक्षण संस्थेची स्थापना करणारे तत्कालीन संचालक मंडळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे होते. त्यामुळे वरील प्रकार केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका 

सरकारने अशांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !