डब्ल्यू-२० परिषदेमध्ये बचत गटांच्या महिलांनी व्यावसायिक अडचणींविषयी मनोगत केले व्यक्त !

महिला बचत गट म्हणजे पापड-लोणची आणि खाद्यपदार्थ करणार्‍या महिलांचे संघ असा काहीसा समज असतो. त्याला छेद देणारे कार्य महिला करत असल्याचे या परिषदेत स्पष्ट झाले.

तिबेटी संस्कृती समूळ नष्ट करण्यासाठी चीन लहान मुलांना बळजोरीने देत आहे तिबेटविरोधी शिक्षण !

काश्मीर प्रश्‍नावरून पाकला साहाय्य करून भारताला डिवचणार्‍या चीनची ही घृणास्पद कृत्ये भारतानेही जगासमोर आणणे आवश्यक ! आंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटना आता गप्प का ?

पुणे जिल्‍ह्यातील १६ अनधिकृत शाळा बंद करण्‍याची नोटीस !

जिल्‍ह्यातील ५३ विनापरवाना शाळांपैकी ३७ शाळा बंद करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यांपैकी ४ शाळांच्‍या विरोधात शिक्षण विभागाने तक्रार प्रविष्‍ट केली असून शाळा बंद करण्‍याचे पत्र (नोटीस) पाठवले आहे. १६ शाळा अनधिकृत असून त्‍यांना ‘शाळा बंद’ करण्‍याचे पत्र पाठवले आहे.

भारतरत्न महर्षी कर्वेंचे महिला सक्षमीकरणाचे कार्य आजही अविरत चालू ! – डॉ. नितीन प्रभूतेंडोलकर

महिला ही एक शक्ती आहे. महिलांची निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे महत्त्वाचे आहे. केवळ ऐकून नव्हे, तर कृतीत आणणे आवश्यक आहे. त्याकरता डब्ल्यू-२० चे आयोजन केले आहे.

भारत स्‍वतंत्र असला, तरी आपली शिक्षणपद्धत पारतंत्र्यातील ! – जगदीश चौधरी, निर्देशक, बालाजी ग्रुप ऑफ इन्‍स्‍टिट्यूशन्‍स, हरियाणा

वर्ष १८२९ मध्‍ये भारतामध्‍ये ६ लाख ७५ सहस्र विद्यापिठे होती. वर्ष १८४९ मध्‍ये इंग्रजांनी केलेल्‍या सर्वेक्षणानुसार भारतातील ९१ टक्‍के भारतीय शिक्षित होते. असे असूनही ‘प्राचीन भारतामध्‍ये महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्‍हता’, असा खोटा प्रचार करण्‍यात येतो.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्‍ये पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमांना प्रवेश अर्ज अल्‍प !

पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्‍ये प्रवेश अर्ज अल्‍प का आले आहेत ? हे विद्यापीठ प्रशासनाने शोधणे आवश्‍यक !

परभणी येथे आर्थिक व्‍यवहारांद्वारे वैयक्‍तिक मान्‍यतेत अपहार करणारे २ शिक्षणाधिकारी निलंबित !

निलंबित करणे, ६ मास चौकशी करून पुन्‍हा अशा अधिकार्‍यांचे स्‍थानांतर करणे, यांमुळे भ्रष्‍ट अधिकार्‍यांच्‍या मनोवृत्तीत कसा फरक पडणार ? अशांना बडतर्फ करून त्‍यांच्‍यावर फौजदारी कारवाई करायला हवी.

मुंबई विद्यापिठाच्या विविध विभागांत ६१ टक्के पदे रिक्त !

मुंबई विद्यापिठाच्या विविध विभागांतील १३६ शिक्षकांची पदे भरण्यास शासनाकडून संमती मिळाली आहे. पदभरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

शैक्षणिक अधःपतन !

कारकून निर्माण करण्‍यासाठी मेकॉलेने चालू केलेली आणि सध्‍याची ‘४+६+२’ ही शिक्षणपद्धत पालटून गुणकर्मानुसार कौशल्‍य प्रशिक्षण ही पद्धत चालू केली, तर विद्यार्थ्‍यांचा आणि पर्यायाने देशाचा खर्‍या अर्थाने गुणात्‍मक विकास होईल.

छत्रपती संभाजीनगर येथील उत्तरपत्रिकांच्‍या हस्‍ताक्षर पालट प्रकरणातील आरोपी दीड मासापासून पसार !

हे पोलिसांना लज्‍जास्‍पद आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षकांची माहिती समजल्‍यानंतर त्‍यांना लगेचच का पकडले नाही ? यामुळे आरोपी पसार होण्‍यात पोलिसांचा सहभाग तर नाही ना ? असा विचार कुणाच्‍या मनात आल्‍यास चूक ते काय ?