सोलापूर जिल्‍हा परिषदेमध्‍ये पदमान्‍यतेसाठी शिक्षणाधिकारी घेतात ८ लाख रुपये !

शिक्षण विभाग पुणे उपसंचालक कार्यालय आणि सोलापूर जिल्‍हापरिषद शिक्षणाधिकारी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्‍टाचार चालू आहे. चौकशी समिती नेमून येथील शिक्षणाधिकार्‍यांची चौकशी करणार का ?

राज्यशासन ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्यामध्ये सुधारणा करणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

राज्यात शिक्षणाचा हक्क कायद्यामध्ये कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर सुधारणा करण्यात येणार आहे. शासन नवीन संकल्पेवर दर्जेदार शिक्षण  मिळतील, अशा शाळांची निर्मिती करणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तारांकित प्रश्नावर उत्तर देतांना २१ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.

‘औ’चा ‘औरंगजेब’ याऐवजी ‘औदुंबर’ या शब्‍दांचा वापर कोकणी उजळणी पुस्‍तकात ते बनवणार्‍यांनी का केला नाही ? अशांवर सरकार कारवाई का करत नाही ?

‘कोकणी उजळणी पुस्‍तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख आणि औरंगजेबाचे रेखाचित्र छापण्‍यात आले आहे. यामुळे गोवा राज्‍यात नवीन वाद निर्माण झाला आहे.

आमची शिक्षणाची योजना चालू राहिल्‍यास एकाही हिंदूचे त्‍याच्‍या धर्माशी कधी प्रामाणिक नाते उरणार नाही ! – लॉर्ड मेकॉलेने वडिलांना लिहिलेल्‍या पत्रातील भाष्‍य

‘भारतीय अवकाश संस्‍थे’च्‍या (‘इस्रो’च्‍या) शास्‍त्रज्ञांनी तिरुपति मंदिरात ‘चंद्रयान-३’ची प्रतिकृती अर्पण केल्‍याने तथाकथित पुरोगाम्‍यांनी केलेल्‍या कांगाव्‍यामागील कारण !

डब्ल्यू-२० परिषदेमध्ये बचत गटांच्या महिलांनी व्यावसायिक अडचणींविषयी मनोगत केले व्यक्त !

महिला बचत गट म्हणजे पापड-लोणची आणि खाद्यपदार्थ करणार्‍या महिलांचे संघ असा काहीसा समज असतो. त्याला छेद देणारे कार्य महिला करत असल्याचे या परिषदेत स्पष्ट झाले.

तिबेटी संस्कृती समूळ नष्ट करण्यासाठी चीन लहान मुलांना बळजोरीने देत आहे तिबेटविरोधी शिक्षण !

काश्मीर प्रश्‍नावरून पाकला साहाय्य करून भारताला डिवचणार्‍या चीनची ही घृणास्पद कृत्ये भारतानेही जगासमोर आणणे आवश्यक ! आंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटना आता गप्प का ?

पुणे जिल्‍ह्यातील १६ अनधिकृत शाळा बंद करण्‍याची नोटीस !

जिल्‍ह्यातील ५३ विनापरवाना शाळांपैकी ३७ शाळा बंद करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यांपैकी ४ शाळांच्‍या विरोधात शिक्षण विभागाने तक्रार प्रविष्‍ट केली असून शाळा बंद करण्‍याचे पत्र (नोटीस) पाठवले आहे. १६ शाळा अनधिकृत असून त्‍यांना ‘शाळा बंद’ करण्‍याचे पत्र पाठवले आहे.

भारतरत्न महर्षी कर्वेंचे महिला सक्षमीकरणाचे कार्य आजही अविरत चालू ! – डॉ. नितीन प्रभूतेंडोलकर

महिला ही एक शक्ती आहे. महिलांची निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे महत्त्वाचे आहे. केवळ ऐकून नव्हे, तर कृतीत आणणे आवश्यक आहे. त्याकरता डब्ल्यू-२० चे आयोजन केले आहे.

भारत स्‍वतंत्र असला, तरी आपली शिक्षणपद्धत पारतंत्र्यातील ! – जगदीश चौधरी, निर्देशक, बालाजी ग्रुप ऑफ इन्‍स्‍टिट्यूशन्‍स, हरियाणा

वर्ष १८२९ मध्‍ये भारतामध्‍ये ६ लाख ७५ सहस्र विद्यापिठे होती. वर्ष १८४९ मध्‍ये इंग्रजांनी केलेल्‍या सर्वेक्षणानुसार भारतातील ९१ टक्‍के भारतीय शिक्षित होते. असे असूनही ‘प्राचीन भारतामध्‍ये महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्‍हता’, असा खोटा प्रचार करण्‍यात येतो.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्‍ये पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमांना प्रवेश अर्ज अल्‍प !

पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्‍ये प्रवेश अर्ज अल्‍प का आले आहेत ? हे विद्यापीठ प्रशासनाने शोधणे आवश्‍यक !