छत्रपती संभाजीनगर येथे तलाठी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या नक्कलची (कॉपीची) ३ लाख रुपयांना विक्री !  

परीक्षार्थींना उत्तरे पुरवणार्‍या टोळीमध्ये ७ जण असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असल्याने पोलीस त्याच दिशेने अन्वेषण करत आहेत.

देहलीत आजपासून ‘जी-२०’ परिषद !

देहलीतील ‘भारत मंडपम्’ या भव्य सभागृहामध्ये ‘जी-२०’ शिखर परिषदेस प्रारंभ होणार आहे. दोन दिवसांच्या या परिषदेला २८ देशांचे प्रमुख आणि युरोपीयन युनियनचे प्रमुख उपस्थित रहाणार आहेत.

ब्रिटनचे दुसरे सर्वांत मोठे शहर बर्मिंगहॅम दिवाळखोर घोषित !

भारताला २०० वर्षे लुटणार्‍या ब्रिटनच्या एका शहराची अशी स्थिती होणे, हा नियतीने केलेला न्याय आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ?

जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहिले पाहिजे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

आरक्षण हे काही आर्थिक आणि राजकीय बरोबरीपुरते मर्यादित नाही, तर ते सामाजिक बरोबरी आणि मान मिळणे, यांसाठी आहे. त्यामुळे राज्यघटनासंमत आरक्षणाचे संघाने नेहमीच समर्थन केले आहे.

वक्फ कायदा रहित करा !

भाजपच्या आमदाराने सरकार दरबारी पाठपुरावा करून वक्फ कायदा रहित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक !

फडणवीस हे ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या माध्यमातून कुणीही जातीचे राजकारण करू नये, असे मत नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

भारत नेपाळकडून पुढील १० वर्षांत विकत घेणार १० सहस्र मेगावॅट वीज !

या निर्णयाविषयी नेपाळचे मुख्यमंत्री पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या कार्यालयाने आनंद व्यक्त केला आहे.

मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंद !

आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, सुनिल कदम, महापालिकेचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त, ‘सह्याद्री रिफ्रेशमेंट’चे राजीव साळुंखे, ‘फोर्सवन मल्टी सर्व्हिसेस’चे भागीदार आणि कर्मचारी, ‘स्नेहा कॅटरर्स’चे भागीदार, महापालिकेचे अधिकारी या सर्वांचा या गुन्ह्यात उल्लेख केला आहे. हा घोटाळा अनुमाने ६ कोटी ३७ लाख रुपयांचा असल्याचे अन्वेषणामध्ये समोर आले आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या तत्कालीन शिक्षण अधिकारी सुनीता धनगर घरात सापडली ९६ लाख ४३ सहस्र रुपयांची बेहिशेबी रक्कम : गुन्हा नोंद !

सुनीता धनगर सारखे अधिकारी शिक्षण क्षेत्रासाठी कलंक असल्याने त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी !

कवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यवाहीला प्रारंभ !  

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सलग कवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार प्रदान करण्याविषयी वृत्तांसह लेख प्रसिद्ध झाला ,त्यामुळे हा पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यवाहीला प्रारंभ झाला.