भाजपचे आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद

मुंबई – मनोज जरांगे पाटील हे जालना येथे मराठा आरक्षण या महत्त्वाच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसले आहेत. सरकारचे प्रतिनिधी त्यांना सातत्याने भेटून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्याविषयी सर्वांनाच काळजी आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे मनोज पाटील यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. फडणवीस हे ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या माध्यमातून कुणीही जातीचे राजकारण करू नये, असे ठाम मत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
या वेळी नितेश राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनात काही क्रांतीकारी निर्णय घेतल्यास ते देशाच्या हिताचेच असणार आहेत.
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !