भारत नेपाळकडून पुढील १० वर्षांत विकत घेणार १० सहस्र मेगावॅट वीज !

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

काठमांडू (नेपाळ) – भारताने नेपाळकडून पुढील १० वर्षांत १० सहस्र मेगावॅट वीज विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविषयी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या कार्यालयाने आनंद व्यक्त केला आहे. (यामुळे नेपाळला लाभ होईल, हे ठीकच; मात्र नेपाळमध्ये सत्तेत असणारे भारतद्वेषी साम्यवादी सरकार त्याला मिळणार्‍या लाभाची परतफेड कशा पद्धतीने करणार, हेही पहावे लागेल ! – संपादक)

कार्यालयाने पुढे म्हटले आहे की, भारताचा हा निर्णय नेपाळच्या आर्थिक विकासासाठी मैलाचा दगड सिद्ध होईल.