कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे ग्रामपंचायतीची ठरावाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोपरगाव २१ फेब्रुवारी (वार्ता.) – शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये क्रूरकर्मा औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद येथे कबर असून त्यावर मोठे बांधकाम करून त्याचे उदात्तीकरण केले जात आहे. खुलताबाद येथे असलेली क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर त्वरित नष्ट करण्यात यावी, या मागणीचा कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे या ग्रामपंचायतीने ठराव करून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे पाठवला आहे. छत्रपतींच्या या पवित्र पावन महाराष्ट्र भूमीतून हा कलंक कायमचा नष्ट करण्यात यावा, अशी मागणी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

या पत्रात पुढे नमूद केले आहे की, औरंगजेब हा परकीय इस्लामिक आक्रमक होता. अतिशय क्रूर, कपटी, निर्दयी, तसेच हिंदुद्वेष्टा होता. लाखो हिंदूंवर त्याने अतिशय अनन्वित अत्याचार करून त्यांना हालहाल करून मारले. लाखो हिंदु स्त्रियांवर अत्याचार करून त्यांना बाटवले. शेकडो हिंदु मंदिरे उद्ध्वस्त केली, तलवारीच्या बळावर हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर केले. त्याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार केले. त्याने महाराजांवर केलेले अत्याचार म्हणजे क्रूरतेची परिसीमाच आहे.
नुकताच विकी कौशल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट प्रसारित झाला आहे. या चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांवरील अत्याचार पाहून समाजातील काही घटकांकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरत आहे.
संपादकीय भूमिकाऔरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात करावी लागणे, हे दुर्दैवी ! |