सातारा शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक होणार ! – खासदार उदयनराजे भोसले, भाजप

ऐतिहासिक सातारा नगरीत छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक नाही, याची उणीव भासत होती. यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून राज्यशासनाच्या वतीने या स्मारकासाठी २ कोटी रुपये निधी संमत झाला आहे

(म्हणे) ‘पंडितांनी बायकांना भ्रष्ट केल्यामुळे औरंगजेबाने ज्ञानव्यापी मंदिराची तोडफोड केली !’ – भालचंद्र नेमाडे

शिवाजीचा मुख्य सेनापती मुसलमान होता. त्याचा स्वत:च्या लोकांवर (हिंदूंवर) विश्‍वास नव्हता. त्या वेळी हिंदू मुसलमान भेदच नव्हता, असेही अकलेचे तारे नेमाडे यांनी तोडले.

सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा यांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा लावण्यात यावी !- रवींद्र धंगेकर, आमदार, काँग्रेस

छत्रपती संभाजी महाराज यांचा राष्ट्रपुरुषांच्या सूचीत समावेश करावा, तसेच शाळा आणि सर्व शासकीय कार्यालये यांमध्ये त्यांची प्रतिमा लावण्यात यावी.

हिंदू मुलींनी आत्मरक्षणासह धर्माधांना धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे ! – विक्रम पावसकर

भारतामध्ये प्रतिवर्षी  सहस्रो हिंदू मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. यासाठी शुद्धधर्माचरण महत्त्वाचे असून हिंदू मुलींनी आत्मरक्षणासह धर्माधांना धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

छत्रपती संभाजी महाराज मोगलांना मिळाले होते का ?

‘शंभूराजांविषयी विविध आक्षेप घेतले जातात. त्यांपैकी महत्त्वाचा अपसमज म्हणजे ते २ वर्षे दिलेरखानाच्या छावणीत होते, म्हणजेच ते मोगलांना जाऊन मिळाले होते. आजही हा अपसमज मोठ्या प्रमाणात कळत नकळत पसरवला जातो.

‘धर्मवीर शंभूराजे’ पुण्यतिथीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून २ लाख ९९ सहस्र रुपये निधी संमत !

आमदार महेश लांडगे यांच्या विशेष प्रयत्नांतून प्रतीवर्षीच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २ लाख ९९ सहस्र रुपये निधी संमत करण्यात आला.

पुरंदर गडावर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी !

पुरंदर गडावर १४ मे या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा शासकीय जयंती सोहळा दिमाखात पार पडला. मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले.

पुण्यात छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण !

‘‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी प्रत्येक गावातील आणि शहरातील मंडळांनी संभाजी महाराजांची जयंती वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरी केली पाहिजे.’’

‘शंभुगर्जना युवा प्रतिष्ठान’च्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी !

१४ मे या दिवशी सकाळी ८ वाजता शिवतीर्थावर (मारुति चौक) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली. ही ज्योत शहरातील विविध मार्गांवरून नेऊन अहिल्यादेवी होळकर चौक, बालाजी मील रोड येथे नेण्यात आली.