शंभूराजांची अपकीर्ती करणार्‍या कमाल खान याला तात्काळ अटक करा !

खडवली (तालुका कल्याण) येथे शंभुदुर्ग संघटनेची आंदोलनात मागणी

कमाल खान

ठाणे, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात ‘विकिपीडिया’वरील अयोग्य माहिती ‘एक्स’वर जाणीवपूर्वक पाठवून अभिनेता कमाल खान याने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. नुकत्याच कल्याण तालुक्यातील खडवली येथे शंभुदुर्ग संघटनेच्या वतीने आंदोलन करून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात कमाल खान याला तात्काळ अटक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली. शासनाने याची उचित नोंद घेऊन कारवाई न केल्यास यापुढे महापुरुषांची अपकीर्ती खपवून घेतली जाणार नाही, असे संघटनेच्या वतीने नमूद करण्यात आले.