बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ‘लोकशाहीला पालथे घालून हुकूमशाही अस्तित्वात आणली’, असा कांगावा करण्यात आला आणि तिथे अराजक निर्माण झाले. परिणामी त्यांना स्वतःच्या देशातून जीव वाचवण्यासाठी हिंदुस्थानात आश्रय घ्यावा लागला. ‘हिंदुस्थानातील विरोधी पक्षाचे नेते हिंदुस्थानामध्ये लोकशाही अस्तित्वात नाही आणि घटना धोक्यात आहे’, असा कांगावा करत आहेत.
‘बांगलादेशच्या पंतप्रधानांना ज्याप्रमाणे स्वतःचा देश सोडून जावे लागले, तसेच हुकूमशाहीच्या मार्गावरून वाटचाल करणार्या मोदींना या देशातून निघून जावे लागणार’, अशा आशयाचे वक्तव्य विरोधी पक्षांचे नेते करत आहेत. त्यांच्या या वक्तव्यातील ही विसंगती नेमकेपणाने लक्षात येण्यासारखी आहे. बांगलादेशात लोकशाही अस्तित्वात नाही, याचे कारण सांगतांना म्हटले जाते की, ‘विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांनी कारागृहात टाकले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना मनमानी कारभार करत आहेत’, असे वातावरण निर्माण करण्यात आले. बांगलादेशमध्ये लोकशाही अस्तित्वात रहावी; म्हणून बांगलादेशातील नागरिक आक्रमक झाले. त्यांच्या या आक्रमकतेमुळे बांगलादेशातील संसद बरखास्त करण्यात आली. परिणामी बांगलादेशातील पंतप्रधान या देश सोडून गेल्या आणि त्यामुळे आता बांगलादेशात शांतता अन् सुव्यवस्था निर्माण होणे अपेक्षित होते.
१. हिंदु समाज निर्वंश करणे म्हणजे लोकशाही आहे का ?
लोकशाहीचे कैवारी असलेल्या बांगलादेशातील नागरिकांनी मात्र तिथे हिंसेचा मार्ग स्वीकारला आणि बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करण्यास आरंभ केला, तसेच हिंदूंची मंदिरेही पाडण्याचे दुष्कृत्य चालू झाले. याचा अर्थ आंदोलन करणार्यांना बांगलादेशात अस्तित्वात असलेली लोकशाही जाचक होती. त्यांना देशात अराजक माजवायचे होते. हिंदुस्थानशी जवळीक साधणार्या पंतप्रधानांविषयीचा राग व्यक्त करायचा होता. त्यासाठी त्यांनी बांगलादेशातील लोकशाही धोक्यात असल्याचा कांगावा करण्यास आरंभ केला आणि त्याला हिंसक वळण देऊन संपूर्ण देश अराजकतेच्या दलदलीत लोटला.
बांगलादेशात लोकशाही अस्तित्वात यावी; म्हणून आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी हिंदूंना लक्ष्य करून त्यांचा संहार आरंभला. याचा अर्थ हिंदूंची जेव्हा कत्तल होते, त्या वेळी त्या त्या देशात लोकशाही अस्तित्वात असते, म्हणजे ‘मुसलमानांच्या दृष्टीने हिंदु समाज निर्वंश करणे, ही लोकशाही आहे’, असा अर्थ यातून निघतो.
२. हिंदू जर हिंसक आहेत, तर मग शेख हसीना यांनी भारतात आश्रय का घेतला ?
हिंदुस्थानातील विरोधी पक्षनेतेसुद्धा ‘हिंदुस्थानातील लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात आहे’, असे घसा खरवडून सांगत आहेत, म्हणजे त्यांना ‘हिंदुस्थानात सध्या बांगलादेशात जी परिस्थिती आहे, जे वातावरण आहे, तसे वातावरण निर्माण करायचे आहे’, असा अर्थ होतो.
‘हिंदु समाज हा आतंकवादी असून तो सतत असत्य बोलत असतो आणि त्या समाजाने हिंदुस्थानात हत्या सत्र चालू केले आहे, म्हणजेच तो समाज ‘हिंसा’ करतो आहे’, असा सूर आळवला जात आहे. हिंदु समाज जर खरोखरच हिंसा करत सुटला असेल, तर शेख हसीना यांनी कोणत्याही इस्लामिक देशात आश्रय न घेता हिंदुस्थानात आश्रय का घेतला ? ‘इस्लामचे जगातील सर्व अनुयायी शांततेचे पुरस्कर्ते असून सहिष्णू आहेत’, असे चित्र रंगवले जाते. मग अशा परिस्थितीत शेख हसीना या स्वतः मुसलमान असूनही त्यांनी मुसलमानांच्या देशात आश्रय घेण्याचा प्रयत्न का केला नाही ? हा प्रश्न उपस्थित होतो.
३. मुसलमानांचे क्रौर्य आणि दुटप्पी धोरण
मुसलमानांचे क्रौर्य हिंदुस्थानच्या विभाजनाच्या वेळी हिंदूंनी अनुभवले आहे. सध्या युरोप खंडात मुसलमानांचा चाललेला हैदोस आणि क्रौर्य याचे विकृत दर्शन सर्व जगाला घडत आहे. एक इस्रायल देश वगळता जगातील कोणताही देश स्वतःकडे लष्करी बळ असून सुद्धा या घातकी आणि क्रौर्याने वागणार्या मुसलमानांच्या विरोधात लष्करी कारवाई करतांना आढळून येत नाही. या मागचे कारण सर्वधर्मसमभावाला प्राधान्य देऊन मुसलमानांना आश्रय दिला. त्यांना सर्व प्रकारच्या सवलती दिल्या. आपल्या देशातील नागरिकांप्रमाणेच त्यांना समान अधिकार दिले. ते अधिकार प्राप्त होताच मुसलमानांनी त्यांच्या पोटातील विष ओठी आणले. सरकारी खात्यात शिरून सर्व अधिकार प्राप्त केले. हळूहळू स्वतःचे संख्याबळ वाढवत नेले. मूळ रहिवाशांच्या लोकसंख्येच्या तुलनेत यांची संख्या वाढताच. त्यांच्यातील राक्षस प्रकट झाला.
वास्तविक मुसलमानांचे हे धोरण दुटप्पी आणि जुने आहे. मुमताज अहमद यांचा ‘फंडामेंटालिझम, रिव्हायवलिस्टस् अँड व्हायलन्स इन साऊथ आशिया’ (Fundamentalism, Revivalists & Violence In South Asia) नावाचे एक पुस्तक आहे. या पुस्तकात मुसलमानी राजकारणाचा दुटप्पीपणा व्यक्त करणारा एक परिच्छेद आढळतो. त्यात ते म्हणतात, ‘‘What is most interesting to note is that while the Jama at in Pakistan denounces secularism as an evil force and the greatest threat to Islam. The Jama at of India is equally vigorous in defending secularism as a blessing & as a gurantee for the safe future for Islam in India.’’
(आशय : सर्वांत चित्तवेधक नोंदवून ठेवण्यायोग्य गोष्ट, म्हणजे पाकिस्तानमधील जामाच्या लेखी पाकिस्तानमध्ये सर्वधर्मसमभाव, म्हणजे सैतानी शक्तीने पाकिस्तानला घातलेला धाक आहे. हिंदुस्थानातील जामा मात्र सर्वधर्मसमभावाचा जोरदार पुरस्कार करतांना आढळून येते; कारण हिंदुस्थानात असलेला सर्वधर्मसमभाव मुसलमानांसाठी आशीर्वाद असून हिंदुस्थानात इस्लाम भविष्यात सुरक्षित रहाण्याची हमी देणारा आहे. (संदर्भ : ‘हिंदुत्व आणि इतर विचारधारा’, लेखक – ज. द. जोगळेकर, प्रकाशक – मनोरमा प्रकाशन, प्रथम आवृत्ती, वर्ष १९९६))
४. मुसलमानांच्या दृष्टीने लोकशाही केव्हा धोक्यात येते ?
आजही आपल्या देशात मुसलमान समाज प्रत्येक वेळेस सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करतांना दिसतो. त्यामागचे कारण हे आहे की, सर्वधर्मसमभाव हा त्यांचे भविष्यातील अस्तित्व निश्चित करण्याची हमी देतो. जेव्हा त्यांच्या या कुटील डावाला विरोध करून काही निर्णय घेतले की, लगेच त्यांचा इस्लाम अडचणीत सापडतो; कारण त्यांना ‘इस्लामी राष्ट्र’ प्रस्थापित करण्याची संधी भविष्यात प्राप्त होणार नाही.
एकाही इस्लामी देशात लोकशाही अस्तित्वात नाही; पण ते जेव्हा अन्य देशात रहातात, तेव्हा तिथे लोकशाही अस्तित्वात आणण्यासाठी धडपडतात. त्या लोकशाहीद्वारे जर त्यांना काही निर्बंध घातले की, लगेच त्या देशातील लोकशाही धोक्यात येते. त्यांच्या दृष्टीने जेव्हा लोकशाही धोक्यात येते, त्या वेळी त्यांचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करण्याचे स्वप्न भंग पावले आहे, याची त्यांना खात्री पटलेली असते.
५. लोकशाहीचा पुरस्कार करण्यामागील मुसलमानांचे खरे स्वरूप !
संपूर्ण जगात इस्लामची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी क्रौर्याचा मार्ग स्वीकारलेला मुसलमान समाज कधीही कोणत्याही अन्य समाजाशी कधीही प्रेमाने वा सलोख्याने रहाणार नाही. विशेषतः त्यांची लोकसंख्या जर वाढत असेल, तर त्यांच्यातील राक्षसी वृत्ती ही त्यांच्या लोकसंख्येच्या बरोबरीने अधिकाधिक बळावत जाते.
आज आपल्या देशातही लोकशाही अस्तित्वात रहावी; म्हणून लोकशाहीचा पुळका दाखवला जातो तोसुद्धा मुसलमान समाजाकडून ‘राज्यघटना आम्हाला प्रिय आहे’, असेही ते वरवर सांगत असतात. त्यांची सत्ता प्रस्थापित होण्यापुरतीच त्यांना लोकशाही आणि राज्यघटना मान्य असते. एकदा का त्यांचे उद्दिष्ट साध्य झाले की, त्यांच्यातील राक्षस जागा होतो. शत्रूपक्षातील पुरुषांना क्रौर्याने मारायचे आणि शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करून त्यांचा अतोनात छळ करून अखेरीस त्यांचा जीव घ्यायचा. यासाठी मोकळे रान मिळावे; म्हणून मुसलमान समाजाची सातत्याने धडपड चाललेली असते. लोकशाहीचा पुरस्कार करण्यामागचा त्यांचा राक्षसी चेहरा आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. हा सावधगिरीचा संदेश देणारा मुमताज महंमद यांच्या पुस्तकातील या लेखात दिलेला परिच्छेद आपल्याला उच्चरवाने सांगत आहे.
६. बांगलादेशातील परिस्थिती लक्षात घेऊन भारताने कोणती भूमिका ठेवणे अपेक्षित आहे ?
बांगलादेशातील परिस्थिती लक्षात घेता आपल्या देशात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये; म्हणून आपण आजच सावध होऊन योग्य ती पावले टाकली, तर आपला तरणोपाय आहे, हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाचार्याची आवश्यकता नाही. वर्ष १९४७ मध्ये आपण स्वातंत्र्य संपादन केले; पण आपल्याला आपला गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेपासून मुक्त करता आला नव्हता. गोव्यातील पोर्तुगीजांची सत्ता विसर्जित करून गोवामुक्त करण्यासाठी अनेक जण धडपड करत होते. त्यात सत्याग्रही सुद्धा होते. नागरिकांनी गोवामुक्तीसाठी अशी धडपड करणे, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मान्य नव्हते. गोवा मुक्त करण्याच्या संदर्भात मत व्यक्त करतांना सावरकर म्हणाले, ‘‘आपला देश स्वतंत्र आहे. आपल्याकडे स्वतःचे लष्करी आणि पोलीसदलाचे बळ आहे. त्याचा उपयोग करून आपल्याला गोवा मुक्त करून हिंदुस्थानात समाविष्ट करता येईल.’’
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (७.८.२०२४)
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलण्यासह देशातील धर्मांधांनाही वठणीवर आणावे ! |