ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रमांचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देणार ! – केंद्र सरकार  

‘ओटीटी’ अ‍ॅप्सवर आतापर्यंत अनेक वेब सिरींजमधून हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान केला गेला आहे.

बलुची लोकांचे आंदोलन आणि भारताचा प्रभाव नष्ट करण्यासाठी चीनकडून माझी नियुक्ती ! – पाकचे सैन्यप्रमुख जनरल अयमान बिलाल यांची स्वीकृती

यातून पाकिस्तान चीनला विकला गेला आहे, असेच स्पष्ट होते ! पुढे चीनने पाकच्या सैन्याला भारताच्या विरोधात युद्ध करण्यास प्रवृत्त केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

देहलीतील इस्रायली दूतावासाजवळील बॉम्बस्फोटासाठी सैन्य वापरत असलेल्या स्फोटकाचा वापर

इस्रायलच्या दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटासाठी ‘पी.ई.टी.एन्.’ प्रकारची स्फोटके वापरण्यात आल्याचे सुरक्षादलातील सूत्रांनी सांगितले. ही स्फोटके सैन्याकडून वापरली जाणारी स्फोटके आहेत.

पुण्यातील एल्गार परिषदेत झळकले कोरेगाव भीमा दंगलीतील संशयित आरोपींचे ‘पोस्टर ’

संशयित आरोपींचे पोस्टर लागूनही पोलिसांनी परिषदेच्या आयोजकांवर कारवाई का केली नाही ?  

आयुक्तांच्या नावे खोटे फेसबूक खाते उघडून पैशांची मागणी

केवळ बनावट खाते बंद करण्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा असे गुन्हे करण्याचे गुन्हेगारांचे धैर्य होणार नाही, अशी कडक कारवाई पोलिसांकडून अपेक्षित आहे !

हे सरकारला लज्जास्पद !

‘केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांतील १४ लाख ५० सहस्र खटले प्रलंबित आहेत. त्यांपैकी २० टक्क्यांहून अधिक म्हणजे २ लाख ५६ सहस्र खटले एकट्या बंगालमध्ये आहेत. यानंतर १ लाख ९२ सहस्र खटले महाराष्ट्रातील आणि १ लाख ६४ सहस्र खटले उत्तरप्रदेशातील आहेत.’  

अनंतनागमध्ये ६ आतंकवाद्यांना शस्त्रसाठ्यासह अटक

आतंकवाद्यांना पोसण्याऐवजी त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

बंदूक दाखवून ओव्हरटेक करणारे ‘ते’ शिवसैनिक नाहीत ! – गृहराज्यमंत्री

वाहतूककोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एक गाडीचालक आणि त्याचा सहकारी इतर वाहनचालकांना बंदुकीचा धाक दाखवत असल्याचा प्रकार मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर घडला होता.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील यांच्यावर खंडणी घेतल्याचा आरोप

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र आणि नगरसेवक नील सोमय्या यांच्यावर वास्तूविशारदाकडून (‘बिल्डर’कडून) खंडणी उकळल्याचा आरोप आहे. अद्याप या प्रकरणी त्यांच्यावर कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.

अवैध व्यवसायांविरोधात धडक कारवाईत पुण्यात ६३ गुन्हेगारांना अटक

येथील विविध अवैध व्यवसायांसमवेत सराईत गुन्हेगारांविरुद्ध २८ जानेवारी या दिवशी संपूर्ण शहरात धाडसत्र राबवत जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार ६३ जणांना अटक केली असून २ लक्ष रुपयांच्या साहित्यासह रोख रक्कम जप्त केली आहे.