आता डोळ्यांना न दिसणार्‍या शत्रूसमवेत आपले युद्ध चालू झाले आहे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपल्याच साधनांचा वापर करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत आहे. जगात कुठेही बसून घरातील माहिती, पैसे आणि अन्य गोष्टींची चोरी या माध्यमातून चालू आहे. असे असले, तरी गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल !

भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात जामनेर (जिल्हा जळगाव) येथे गुन्हा नोंद

भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत लभान गोरबंजारा समाजातील महिलांविषयी अपमानास्पद लिखाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

रायगड येथून अमली पदार्थ विक्रेत्यास अटक

अमली पदार्थ विक्रेता आरिफ भुजवाला याला अमली पदार्थ नियंत्रक विभागाने रायगडमधून अटक केली आहे. आरिफ हा दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीश इब्राहिमचा जवळचा साथीदार असल्याचे सांगितले जात आहे.

लाच घेतल्याच्या प्रकरणी अटक केलेले अधिकारी सुरेश रेड्डी यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

बक्षीस पत्राचा सिटी सर्व्हेचा उतारा देण्यासाठी ७५ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी नगरभूपान अधिकारी सुरेश रेड्डी यांना २५ जानेवारी या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍या अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आदी आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

वास्तविक अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून अशा आस्थापनांच्या विरोधात कारवाई करणे अपेक्षित आहे !

मद्यधुंद टँकर चालकाने १५ वाहनांना ठोकले : ७ जण गंभीर

मद्य पिऊन वाहन चालवणार्‍यांवर कठोर कारवाई केल्यास इतरांना धाक बसेल.

बनावट नोटा देऊन शेतकर्‍याची फसवणूक करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात

बनावट नोटा अद्यापही छापल्या जातात हे लक्षात येते. याच्या सूत्रधाराला अटक करून पाळेमुळे नष्ट करणे आवश्यक आहे.

आक्षेपार्ह कृत्य करणारा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना खडसावले म्हणून शिक्षकाला झालेल्या मारहाणीचा शिक्षक भारती संघटनेकडून निषेध

बालवयापासूनच नैतिकता शिकवणे आणि धर्मशिक्षण देणे किती अपरिहार्य आहे, हे अशा घटनांतून लक्षात येते !

शंकर बँकेची माहिती (डेटा) ‘हॅकर’ला पुरवल्याचा पोलिसांना संशय

ऑनलाईन’ दरोडा प्रकरणी बँकेशी संबंधित व्यक्तीकडूनच बँकेची महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती ‘हॅकर्स’ला ‘कमिशन’वर पुरवली गेली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

नेर (यवतमाळ) येथे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ५ जणांना अटक

तालुक्यातील बाणगाव येथे एका सायंकाळी ख्रिस्ती धर्माचा प्रसार चालू होता. ही गोष्ट भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल राठोड यांच्या लक्षात येताच त्यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी पोचून ख्रिस्ती धर्मप्रसारकांना घेराव घातला