बोलेरो वाहनाच्या चोरीप्रकरणी धर्मांधाला पोलीस कोठडी

वाहनाची चोरी केल्याप्रकरणी संशयित हबीब रहिमतुल्ला गडकरी याला ७ दिवसांची पोलीस कोठडी

शिवोली येथे दोन वयोवृद्ध महिलांचा निर्घृण खून

दोन्ही वयस्कर महिलांचा प्रथम तीक्ष्ण हत्यार हाणून आणि नंतर चाकू खुपसून खून करण्यात आला.

सातारा येथे रात्री १२ वाजल्यानंतर पोलिसांकडून तपासणी

कोरोनामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चोर्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

बनावट नोटांसह देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद !

कराड तालुक्यातील कोळेवाडी येथे ९४ सहस्र ५०० रुपयांच्या बनावट नोटा आणि देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. ठाणे गुन्हे शाखा आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.

हिंदु नाव सांगून ४ पत्नी आणि ४ मुले असणार्‍या धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण

४२ वर्षीय अब्दुल्ला या ४ पत्नी आणि ४ मुले असणार्‍याने ‘अमन चौधरी’ असे हिंदु नाव सांगून एका १७ वर्षांच्या हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे टवाळखोरांच्या छेडछाडीमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

अमेरिकेत शिक्षण घेणारी आणि सध्या घरी आलेली येथील सुदीक्षा भाटी हिचा टवाळखोरांच्या छेडछाडीमुळे मृत्यू झाल्याची घटना येथे घडली. गरीब कुटुंबातील असलेल्या सुदीक्षा हिने अमेरिकेतील शिष्यवृत्ती मिळवली होती आणि तेथे ती शिकत होती.

 वर्धा येथील बंदीवानाची जिल्हा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील आरोपी गोपीचंद डहाके (वय ३८ वर्षे) याच्यावर हत्येचा गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा दिली होती. त्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. ६ ऑगस्ट या दिवशी पहाटेच्या सुमारास बंदीवान डहाके याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

येरवडा स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लवकर क्रमांक लावण्यासह अस्थी परत देण्यासाठी पैशांची मागणी

समाजातील नैतिकता आणि माणुसकी हरवत चालल्याचे दर्शवणारी घटना ! मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या असंवेदनशील कर्मचार्‍यांवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी !

पुणे जिल्ह्यात अवैध उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी केवळ दंडात्मक कारवाई

दळणवळण बंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार पूर्णपणे बंद असतांनाही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैध उत्खनन आणि वाहतूक चालू आहे. यावर कारवाई करत जिल्हा प्रशासनाकडून दोन मासांत १७ कोटी ८३ लाख रुपयांचा दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आला आहे.

चिपळूण येथे मास्क न वापरणार्‍या २३६ जणांवर कारवाई : १ लाख १८ सहस्र रुपयांचा दंड वसूल

प्रशासनाने मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. येथील बाजारपेठेत विनामास्क फिरणारे आणि दुकानांमध्ये मास्क न वापरणारे अशा २३६ जणांवर नगरपरिषदेच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली.