नाशिक येथे प्लास्टिक बॉलमध्ये फटाक्यांची दारू सापडली

कुलकर्णी गार्डन परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या घराबाहेर बॉम्बसदृश वस्तू सापडली. ती निकामी करतांना प्लास्टिक बॉलमध्ये फटाक्यांची दारू असल्याचे समजले. वेळीच अनर्थ टळला. या माध्यमातून भीती पसरवण्याचा हेतू असल्याचे समजते.

संभाजीनगर येथे विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करणारे पथक आणि माजी आमदार यांच्यात हाणामारी

मास्कविना फिरणार्‍यांवर कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेले नागरी मित्र पथक आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांच्यात १ मार्च या दिवशी वाद निर्माण होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यातील एक जण पसार झालेला आहे.

फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

सर्कोझी यांची बाजू मांडणारे वकील आणि न्यायाधीश हेही दोषी ! भारतात एवढ्या उच्चपदांवर कार्यरत असणार्‍या भ्रष्ट राजकारण्यांना कधी अशी शिक्षा होते का ?

लिव-इन रिलेशनशिपमध्ये सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यावर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

पुरुष किंवा महिला विवाहाचे आश्‍वासन पाळत नसेल, तेव्हा बलात्काराचा होणारा आरोप मान्य करता येणार नाही.

गाय आणि अन्य जनवरे यांच्या हत्या रोखण्यासाठी नियमांची कार्यवाही करा ! – कोलकाता उच्च न्यायालयाचा कोलकाता महापालिकेला आदेश

असा आदेश का द्यावा लागतो ? पालिकेला तिचे दायित्व ठाऊक नाही का ?

मुलीची छेड काढण्याच्या तक्रारीवरून आरोपींकडून पित्याची गोळ्या झाडून हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा !

बलात्काराच्या प्रकरणी जन्मठेपेच्या शिक्षेतील २० वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर आरोपीची निर्दोष मुक्तता

निर्दोष असूनही २० वर्षे कारागृहात रहावे लागणे, हा घोर अन्याय नव्हे का ?

पानवण (सातारा) येथील आधुनिक वैद्य नानासाहेब शिंदे यांचे अपहरण

सातारा, १ मार्च (वार्ता.) – म्हसवड तालुक्यातील पानवण येथे २७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी शेताच्या कामानिमित्त गेलेले आधुनिक वैद्य नानासाहेब शिंदे रात्री उशिरापर्यंत परत आले नाहीत.

गुटख्याची पाळेमुळे शोधण्यासाठी संभाजीनगर येथील पोलीस सातारा शहरात तळ ठोकून !

सातारा – संभाजीनगर येथील पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हिरा गुटख्याची वाहतूक करणार्‍या ३ गाड्यांसह ३ आरोपींना कह्यात घेतले होते. या वेळी त्यांच्याकडून गुटख्याची २३ पोती आणि ३ वाहने असा ७ लाखांहून अधिक मुद्देमाल शासनाधीन केला.

देहलीत सोनसाखळी चोरतांना महिलेची हत्या करणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

अल्पसंख्य धर्मांधांचे गुन्हेगारीत मात्र सर्वाधिक प्रमाण !