विवाह सोहळ्याला १ सहस्र ५०० लोकांची गर्दी केल्याप्रकरणी हिंगोली येथील मंगल कार्यालयावर गुन्हा नोंद

हिंगोली – येथील साई मंगल कार्यालयात झालेल्या विवाह सोहळ्याला १ सहस्र ५०० लोकांनी गर्दी केल्याने मंगल कार्यालयाच्या मालकावर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येथे विवाह सोहळ्यासाठी केवळ ५० लोकांना अनुमती देण्यात आली असतांनाही २५ फेब्रुवारी या दिवशी अधिक संख्येने विवाह सोहळ्याला गर्दी केल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.